Join us   

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? रोज खा 'हे' १ ड्रायफ्रूट ; हाडं होतील मजबूत - वजनही घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 9:55 AM

4 Amazing Health Benefits Of Anjeer : हाडांच्या दुखण्याने त्रस्त? खाल्लेलंही व्यवस्थित पचत नाही?

आजकाल लोकांमध्ये हाडांचे दुखणे वाढले आहे (Bones Health). कमी वयात हाडं दुखतात, ठणकतात, अशी तक्रार बरीच लोक करतात. आपलं पूर्ण शरीर हाडांवर अवलंबून असते (Calcium for Bones). हाडांचे दुखणे वाढल्यावर बसता - उठता त्रास होतो. जसजसे वय वाढते तस तसे हाडं ठिसूळ होतात, आणि हाडांचे दुखणेही वाढते (Health Tips).  हाडांसाठी कॅल्शियम गरजेचं आहे. फक्त हाडं नसून, हृदय, स्नायू आणि दातांसाठी कॅल्शियम गरजेचं आहे. शरीराला कॅल्शियम मिळावे म्हणून आपण दुग्धजन्य पदार्थ खातो. पण काहींना दुग्धजन्य पदार्थ आवडतीलच असे नाही.

काही जण दूध, दही, पनीरचे पदार्थ खाणं टाळतात. जर आपल्याला दुधाशिवाय शरीराला ड्रायफ्रुट्सद्वारे कॅल्शियम मिळावे असं वाटत असेल तर, अंजीर खा. अंजीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अंजीरला पोषक तत्वांचे पॉवर हाउसही मानले जाते. आपण नियमित २-३ अंजीर पाण्यात भिजवून खाऊ शकता(4 Amazing Health Benefits Of Anjeer ).

अंजीर खाण्याचे फायदे

अंजीरमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फायबर, ब6 जीवनसत्व, ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आपण अंजीर न भिजवताही खाऊ शकता. कारण सुके अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

अंजीर खाण्याचे इतर फायदे

लठ्ठपणा होईल कमी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण आहारात अंजीरचा सामावेश करू शकता. कारण अंजीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जे वजन कमी करण्यास मदत करते.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

दमा

दमा असलेल्या रुग्णांसाठी अंजीर फायदेशीर ठरू शकते. अंजीर खाल्ल्याने त्वचेला आद्रता मिळते. ज्यामुळे फुफुसातील कफ साफ होतो. अस्थमाग्रस्त रुग्ण दुधासोबत अंजीर खाऊ शकता.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण अंजीर खाऊ शकता. कारण त्यात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियमचे गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

बद्धकोष्ठता

जर आपल्याला बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या निगडीत समस्या असल्यास अंजीर खा. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स