Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ४ पदार्थ नियमित खा, किडनीचे आजार राहतील दूर, इन्फेक्शनही टाळता येईल..

४ पदार्थ नियमित खा, किडनीचे आजार राहतील दूर, इन्फेक्शनही टाळता येईल..

Healthy Food For Kidney: स्वयंपाक घरातले आपले नेहमीचेच ५ पदार्थ.. पण किडनीसाठी ठरतात लाखमोलांचं टॉनिक. म्हणूनच हे पदार्थ नियमित खा आणि हेल्दी रहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 07:30 PM2022-06-11T19:30:03+5:302022-06-11T19:30:41+5:30

Healthy Food For Kidney: स्वयंपाक घरातले आपले नेहमीचेच ५ पदार्थ.. पण किडनीसाठी ठरतात लाखमोलांचं टॉनिक. म्हणूनच हे पदार्थ नियमित खा आणि हेल्दी रहा.

4 Ayurvedic herbs in your kitchen that helps to keep you away from various kidney diseases | ४ पदार्थ नियमित खा, किडनीचे आजार राहतील दूर, इन्फेक्शनही टाळता येईल..

४ पदार्थ नियमित खा, किडनीचे आजार राहतील दूर, इन्फेक्शनही टाळता येईल..

Highlightsखूप काही वेगळं करण्याची गरज नाही. स्वयंपाक घरातले नेहमीचेच काही पदार्थ नियमित खा. हे पदार्थ नक्कीच तुम्हाला किडनीसंदर्भात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतील

किडनीचे म्हणजेच मुत्रपिंडाचे वेगवेगळे आजार होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. हृदयरोगाप्रमाणेच कमी वयातच आता किडन्यांचे आजारही (kidney diseases) गाठत आहेत. याला कारण म्हणजे पाणी कमी प्यायलं जाणं, फास्टफूड- जंकफूडचं वाढलेलं प्रमाण आणि काही प्रमाणात व्यायामाचा अभाव. शरीरातील विषारी द्रव्ये (toxins) शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. त्यामुळे शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवायचं असेल तर किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचंच आहे. त्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही. स्वयंपाक घरातले नेहमीचेच काही पदार्थ नियमित खा. हे पदार्थ नक्कीच तुम्हाला किडनीसंदर्भात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतील अशी माहिती डॉ. निकिता कोहली यांनी HT सोबत बोलताना शेअर केली. (healthy food for kidney)

 

किडनीचं आरोग्य जपणारे ५ पदार्थ
१. आलं (ginger)

आल्यामध्ये असणारा जिंजरॉल हा घटक शरीराची आतून शुद्धी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळेच आलं हे डिटॉक्स एजंट म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळेच अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये आल्याचा वापर केला जातो. आलं किडनी तसेच लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. 

 

२. हळद (turmeric)
किडनीला होणारा संसर्ग तसेच युरिनरी ट्रॅकला होणारा संसर्ग आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी हळद उपयुक्त ठरते. आपल्या नेहमीच्या स्वयंपाकात हळद असतेच. पण तरीही आठवड्यातून एक- दोनचा हळदीचं दूध घ्यावं किंवा हळद- आल्याचा काढा करून प्यावा. असं नियमितपणे केल्यास किडन्या फेल होण्याचा धोकादेखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

 

३. धने (coriender)
मसाल्याच्या डब्यात नेहमीच असणारा हा पदार्थ. पण मसाल्याची भाजी किंवा काही खास पदार्थ केले तरच धने वापरात येतात. मुत्राशयाचा संसर्ग किंवा त्यासंदर्भातले इतर कोणतेही आजार होऊ नये म्हणून धने उपयुक्त ठरतात. किडनीला निरोगी ठेवण्यासाठी धने नियमित खाणं गरजेचं आहे. त्यासाठी धने भाजून त्याची पावडर करून ठेवा आणि ती वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, वरणात, पराठ्यात टाकत चला. यामुळे धने खाल्ले जातील. 

 

४. त्रिफळा (trifala)
आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन आयुर्वेदिक वनस्पती एकत्र करून त्रिफळा चूर्ण बनते. आयुर्वेदात त्रिफळा चुर्ण अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. किडनी आणि लिव्हर यांचे कार्य अधिक चांगले होण्यासाठी त्रिफळा चुर्ण अतिशय उपयुक्त ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारणे, डोळ्यांचे आरोग्य, त्वचाविकार असेही काही त्रिफळा चुर्णचे फायदे आहेत. 

 

Web Title: 4 Ayurvedic herbs in your kitchen that helps to keep you away from various kidney diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.