Join us   

पोट गच्च झालं, फुगल्यासारखं वाटतं? ४ सोपे उपाय- गॅस पास होईल-वाटेल चटकन बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 4:16 PM

How To Get Relief From Constant Bloating And Gasas: ब्लोटिंग झाल्यासारखं म्हणजेच पोट फुगून गच्च झाल्यासारखं वाटत असेल तर लगेचच डॉक्टरांनी सांगितलेले हे काही घरगुती उपाय करून पाहा..(4 Ayurvedic home Remedies To get rid of Bloating and gases)

ठळक मुद्दे असा त्रास सुरू झाल्यास घरच्याघरी काय उपाय करता येतील, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच..

सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे अनेक लोकांना सतत नऊ दिवस उपवासाचे पदार्थ खाऊन पोट फुगल्यासारखं, गच्चं झाल्यासारखं वाटतं. तसेच ज्यांचे उपवास नाहीत त्यांनाही नवरात्रीत गोडधोड खाऊन पोट फुगण्याचा त्रास होताेच. शिवाय जे लोक खूप जास्त वेळ बसून काम करतात, ज्यांच्या शारिरीक हालचाली कमी आहेत, त्यांना पोट फुगण्याचा, गॅसेस होण्याचा, पोट गच्चं किंवा कडक होण्याचा त्रास होतोच (How To Get Relief From Constant Bloating And Gasas). म्हणूनच असा त्रास सुरू झाल्यास घरच्याघरी काय उपाय करता येतील, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच.. तुम्हाला कधी ना कधी ती नक्कीच उपयोगी ठरेल.(4 Ayurvedic home Remedies To get rid of Bloating and gases)

पोट फुगल्यासारखं होऊन गच्चं झालं असेल तर उपाय...

 

पोटाचा, अपचनाचा त्रास होत असेल तर घरच्याघरी काय उपाय करावेत, याविषयी डॉ. वरलक्ष्मी यनमंद्रा यांनी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. यामध्ये त्यांनी ४ अगदी साधे- सोपे उपाय सुचविले आहेत.

पराठे, भाजीसाठी बटाटे उकडायला खूप वेळ लागतो? १ सोपी ट्रिक- फक्त ४ मिनिटांत उकडा बटाटे

१. अन्न व्यवस्थित चावून खा

जे लोक खूप पटापट जेवतात, त्या लोकांना बऱ्याचदा पोट गच्च होण्याचा त्रास होतो. कारण ते प्रत्येक घास व्यवस्थित चावून बारीक न करता तसाच गिळून टाकतात. असं अन्न पचवायला खूप जड जातं. त्यामुळे मग पोट गच्चं होण्याचा त्रास होतो. त्यामुळेच कितीही घाई असली तरी जेवण मात्र सावकाश करा. प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. गॅस, पोट फुगणे हा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

 

२. ओवा

ओवा अन्न पचनासाठी खूप मदत करताे. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला ओव्याचा काढा घ्या.

वाढदिवसाला केक, पेस्ट्री खाणं महागात पडू शकतं! FSSAI ने दिला कॅन्सरचा धोका- 'हे' केक खाणं टाळाच

किंवा ओव्याची पूड करून तिचा वापर तुमच्या स्वयंपाकात आवर्जून करा. जेवण झाल्यानंतर ओवा बारीक चावून खा आणि त्यावर १ ग्लासभर कोमट पाणी प्या.

 

३. बडिशेपाचं पाणी

ओव्याप्रमाणेच बडिशेपसुद्धा अन्न पचनासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे जेवणानंतर बडिशेप व्यवस्थित चावून खा. १ ग्लास पाण्यात १ टेबलस्पून बडिशेप टाकून उकळा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. जेवण झाल्यानंतर किंवा जेवणादरम्यान हे पाणी कोमट असताना प्या. अपचनाचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

'मी खूप नशिबवान आहे; मला रितेशसारखा नवरा मिळाला'- नवऱ्याचं कौतुक करत जेनेलिया डिसुझा म्हणाली ...

४. ताजं अन्न खा

पोट फुगणे, पोट गच्च होणे, अपचन असा कोणत्याही प्रकारचाा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नेहमी ताजं, गरम अन्न खाण्यास प्राधान्य द्यावे. थंड झालेले, शिळे अन्न टाळावे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय