Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

How To Control Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही पदार्थही उत्तम औषधी ठरू शकतात. बघा याबाबत तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 03:41 PM2022-09-16T15:41:49+5:302022-09-16T15:42:42+5:30

How To Control Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही पदार्थही उत्तम औषधी ठरू शकतात. बघा याबाबत तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.

4 Ayurvedic remedies for controlling blood sugar level, 4 herbs in our kitchen useful for diabetes | ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

Highlightsडॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहासाठी औषधी तर घ्याच, पण रोजच्या आहारात काही पदार्थही आवर्जून घ्या, अशी माहिती तज्ज्ञ सांगत आहेत.

सततचा ताण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल, व्यायामाचा अभाव आणि याला काही प्रमाणात अनुवंशिकतेची जोड. यामुळे मधुमेहींचे (diabetes) प्रमाण खूप जास्त वाढले आहे. हल्ली तर तिशी- पस्तिशीतच मधुमेह तरुणांना गाठू लागला आहे. मधुमेह झाला म्हणजे मग तो नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधींचा भडीमार तर करावा लागतोच, पण खाण्या- पिण्याची खूप पथ्येही पाळावी लागतात. एवढे करूनही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणारच (How To Control Blood Sugar Level), याची काही खात्री नसते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहासाठी औषधी तर घ्याच, पण रोजच्या आहारात काही पदार्थही आवर्जून घ्या, अशी माहिती डॉ. जिनल पटेल यांनी इंडिया डॉट कॉम यांच्याशी बोलताना दिली.  

 

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय
१. मेथ्याचे दाणे (Fenugreek)

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथ्या उपयोगी असतातच. पण त्यासोबतच स्थुलता आणि कोलेस्टरॉल कमी करण्यासाठीही त्यांची मदत होते. त्यामुळे दररोज सकाळी १ टीस्पून एवढे भिजवलेले मेथीचे दाणे खावेत.

 

२. दालचिनी (Cinnamon)
मधुमेह असणाऱ्यांनी दालचिनीचे थोड्या प्रमाणात नियमित सेवन केले पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. यामुळे इन्सुलिनचे स्त्रवण आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या दोन्ही गोष्टी नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी तसेच कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही दालचिनीचा उपयोग होतो. पण दालचिनी उष्ण असल्याने तिचा अतिरेकी वापर टाळावा.

 

३. आलं (Ginger)
आल्यामध्ये ॲण्टी डायबेटिक, हायपोलिपिडेमिक आणि ॲण्टी ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात. त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि फास्टिंग शुगरचे प्रमाण कमी होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज किती प्रमाणात आले खायला हवे, हे मधुमेहींनी ठरवून घ्यावे. 

 

४. मिरे (Black Pepper)
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि शरीराची इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी वाढविण्यासाठी मिरे उपयोगी ठरतात. मिऱ्यांमध्ये असणारा पाईपराईन हा घटक मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो. 
 

Web Title: 4 Ayurvedic remedies for controlling blood sugar level, 4 herbs in our kitchen useful for diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.