Join us   

रोज खा एक 'खजूर'! बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; रक्ताभिसरण वाढेल - थकवाही होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2024 4:23 PM

4 benefits of consuming 3 Dates every day : खजूर खाण्याचे फायदे फार; रोज एक खाल तर शरीर तंदुरुस्त राहणारच..

निरोगी आरोग्याच्यादृष्टीने आहार आणि शरीराची हालचाल महत्वाची (Health Tips). काही लोक दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. जे अत्यंत चुकीचे आहे (Dates). पण जर आपण हेल्दी पदार्थ, आणि ड्रायफ्रुट्सने दिवसाची सुरुवात कराल, तर नक्कीच याचा फायदा आरोग्याला होईल (Dry Fruits). सध्या पावसाळा सुरु आहे (Bone Health).

सुकामेव्यामध्ये खजूर खाण्याचा सल्ला मिळतो. खजूर हे फायबर, पोटॅशियम आणि लोह याने समृद्ध असतात. यातील पौष्टीक घटकांमुळे याला वंडर फूडही म्हणतात. जर आपल्याला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, आपण खजूर खाऊ शकता. यामुळे तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर राहतील(4 benefits of consuming 3 Dates every day).

ऊर्जा आणि जीवनसत्त्वे यांचा भंडार

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते. जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. ज्यामुळे दिवसभर सक्रीय राहण्याची उर्जा मिळते. खजूरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. जसे की, जीवनसत्त्वे बी आणि सी. आणि खनिजे जसे की पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह. ज्याचा फायदा आरोग्याला पुरेपूर होतो.

कोण म्हणते ' त्या ' मैत्रिणी नसतात, एकमेकींवर जळतात! बघा, सेलिब्रिटी मैत्रिणींच्या या खास जोड्या

पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम

खजूरमध्ये फायबर असते जे पोट निरोगी ठेवते. खजूरमध्ये पोटॅशियम असते जे हृदय निरोगी ठेवते आणि रक्तदाब नियंत्रित राहते. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला विविध आजारांपासून रक्षण करतात.

हाडांसाठी उत्तम

खजूरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जे त्वचा निरोगी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.

घरातल्या कुंडीत कडीपत्ता वाढतच नाही? त्यात घाला चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; मिळतील भरपूर सुगंधी पाने

रक्ताची कमतरता होते दूर

खजूरमध्ये लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. खजूरमध्ये फायबर असते जे पचन व्यवस्थित ठेवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य