Join us   

जायफळ घालून दूध पिण्याचे ४ फायदे, स्ट्रेस होईल कमी - ' असे ' करा जायफळ दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 1:58 PM

4 benefits of nutmeg milk, from digestion problem to stress relief : नुसतं निचळ दूध पिऊ नका, त्यात घाला चमचाभर जायफळ पावडर, आरोग्यासाठी फायदेशीर कारण..

दुधामधील पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन तत्त्व असते, शिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आढळते. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण दुधातील आणखी पौष्टिकता वाढवायची असेल तर, त्यात चमचाभर जायफळ पावडर घालून प्या.

जायफळात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी६, ए, सोडियम आणि जस्त असते. यामुळे निद्रानाश, पोटाचे विकार यासह इतर आजारांवर लाभदायक उपाय म्हणून काम करते. दुधात जायफळ पावडर मिक्स करून पिण्याचे फायदे किती? याची माहिती ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटला आयुर्वेदाचार्य डॉ एम मुफिक यांनी दिली आहे(4 benefits of nutmeg milk, from digestion problem to stress relief).

तणाव करेल दूर

आजच्या काळात लोकांना अनेक गोष्टींचा स्ट्रेस असतो. बरेच लोकं तणाव, चिंता, इत्यादींना बळी पडतात. अशा परिस्थितीत या मानसिक समस्या दूर करण्यासाठी जायफळ दूध उपयुक्त ठरू शकते. जायफळमध्‍ये अँटी-स्‍ट्रेस गुणधर्म असतात, जे केवळ तणाव दूर करण्‍यासाठी उपयुक्त नसून, मूडही सुधारण्यास मदत करतात.

बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

पोटाचे विकार होते कमी

पोटाचे अनेक विकार दूर करण्यासाठी आपण दुधात जायफळ पावडर मिसळून पिऊ शकता. यासाठी कपभर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात चमचाभर जायफळ पावडर घालून मिक्स करा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व दूध कोमट झाल्यानंतर प्या. यामुळे पचन सुधारते. शिवाय पोट फुगणे, बद्धकोष्ठतेसारखा त्रास होत नाही.

त्वचा दिसते चमकदार

जायफळ दूध फक्त आरोग्यासाठी नसून, त्वचेला चमकदार करण्यासही मदत करते. दुधात जायफळ पावडर मिक्स करून प्यायल्याने किंवा चेहऱ्यावर लावल्याने, त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. जर आपल्या चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी करायचे असतील तर, जायफळ दूध फायदेशीर ठरू शकते.

शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात

सांधेदुखीच्या समस्येपासून आराम

जायफळात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. नियमित जायफळ दूध प्यायल्याने सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सदूधआरोग्य