Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सुकामेवा आणि विविध प्रकारच्या बिया नियमित खाऊनही पोषण नाहीच? तज्ज्ञ सांगतात, नेमकं खायचं कसं..

सुकामेवा आणि विविध प्रकारच्या बिया नियमित खाऊनही पोषण नाहीच? तज्ज्ञ सांगतात, नेमकं खायचं कसं..

4 benefits of soaked seeds Healthy Diet tips : नियमितपणे विविध बियांचा आहारात समावेश ठेवल्यास काही शारीरिक तक्रारी दूर राहण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 05:58 PM2024-01-25T17:58:17+5:302024-01-25T19:06:17+5:30

4 benefits of soaked seeds Healthy Diet tips : नियमितपणे विविध बियांचा आहारात समावेश ठेवल्यास काही शारीरिक तक्रारी दूर राहण्यास मदत होते.

4 benefits of soaked seeds Healthy Diet tips : Dry fruits, seeds should be eaten regularly, but how? Experts say, if you want to get enough nutrition... | सुकामेवा आणि विविध प्रकारच्या बिया नियमित खाऊनही पोषण नाहीच? तज्ज्ञ सांगतात, नेमकं खायचं कसं..

सुकामेवा आणि विविध प्रकारच्या बिया नियमित खाऊनही पोषण नाहीच? तज्ज्ञ सांगतात, नेमकं खायचं कसं..

आपला आहार हा विविध पदार्थांनी युक्त हवा असे आपण वारंवार ऐकतो. पण रोजच्या धावपळीत आपल्याला ते जमतेच असे नाही. सीडस म्हणजेच विविध प्रकारच्या बिया हा आराहातील एक महत्त्वाचा घटक असून दररोज २ चमचे बिया तरी आहारात घ्यायला हव्यात. यामध्ये चिया सीडस, फ्लेक्स सिडस, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांचा समावेश होतो. यासोबतच भुईमूगाच्या शेंगातील बिया, बदाम, आक्रोड अशा सुकामेव्याचाही आहारात आवर्जून समावेश असायला हवा (4 benefits of soaked seeds Healthy Diet tips).

आता या बिया खायच्या हे जरी खरे असले तरी त्या भिजवून खाल्ल्या तर शरीराला त्यातून जास्त फायदे मिळतात. यासाठी सुकामेवा खाण्याआधी ४ ते ६ तास भिजवणे गरजेचे आहे. भिजवायला विसरलात तर किमान भाजून खायला हव्यात. नियमितपणे विविध बियांचा आहारात समावेश ठेवल्यास काही शारीरिक तक्रारी दूर राहण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम करत असलेल्या शिवांगी देसाई या बियांबद्दल ४ महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात त्या कोणत्या पाहूया...

१. हार्मोन संतुलित राहण्यास मदत

शरीरातील सर्व हॉर्मोन्स योग्य प्रकारे काम करत असतील तर शरीरातील सर्व क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. बियांमध्ये चांगले फॅट्स असतात. पाण्यात भिजवल्याने ते फॅट्स पचायला मदत होते आणि हार्मोन्सचे संतुलन राहते. 

२. पचनक्रिया सुधारण्यास मदत 

बियांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, खाल्लेले अन्न पाचण्यासाठी फायबर हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे एकूण पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी सुकामेवा भिजवून खाणे उपयुक्त असते. 

३. हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर 

सुकमेव्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हृदयाचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास आणि दीर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते. 

४. खनिजांचा उत्तम स्त्रोत

सुकामेव्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे असतात. यात सिलेनिअम, मॅग्नेशियम, झिंक, तांबे यांचा समावेश असतो.

Web Title: 4 benefits of soaked seeds Healthy Diet tips : Dry fruits, seeds should be eaten regularly, but how? Experts say, if you want to get enough nutrition...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.