रोज सकाळी बदाम (Badam) खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते (Memory Power). पण वाढत्या वयानुसार मेमरी लॉस (Memory Loss) देखील होऊ लागते (Memory Boost). ज्यामुळे आपण वारंवार बऱ्याच गोष्टी विसरतो. गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होऊ लागतो. मग फक्त बदामानेच स्मरणशक्ती वाढते तर, असं नाही. स्मरणशक्ती वाढवायची असेल तर, खाण्याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. कारण आहारामुळे आपल्या मनावर आणि स्मरणशक्तीवर खोलवर परिणाम होतो. काही निवडक पदार्थांमुळे स्मरणशक्ती तर वाढतेच, यासह तणाव दूर ठेवण्यासही मदत करते.
स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका शेरावत यांनी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, याची माहिती दिली आहे. यामुळे स्मरणशक्ती नसून, आरोग्यही सुदृढ राहील. शिवाय आरोग्याला बरेच फायदे मिळतील(4 Best Foods to Boost Your Brain and Memory).
आदित्य रॉय कपूर म्हणतो, मला ‘अशी’ जोडीदार हवी, चिडकी रडकी अजिबात नको कारण..
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी टिप्स
अँटिऑक्सिडंट
मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी आहारात अँटिऑक्सिडंटने समृद्ध पदार्थांचा समावेश करा. यासाठी आहारात बेरी, कलिंगड यासह इतर प्रकारचे फळे खा. अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळे खाल्ल्याने, मेंदूच्या पेशी वाढतात आणि लवकर वृद्ध दिसण्यापासून सरंक्षण करतात.
हेल्दी फॅट
आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश करा. हेल्दी फॅट म्हणजे मोनोसॅच्युरेटेड फॅट, फॅटी ॲसिड किंवा ओमेगा-३ फॅटी ॲसिड. हे सर्व नट आणि बियांमध्ये आढळतात. त्यामुळे दिवसातून किमान दोन अक्रोड खावेत.
फक्त २ आठवड्यात हेअर डायचा रंग उडतो, केस दिसतात कसेतरीच? ४ चुका टाळा, रंग टिकेल भरपूर
धान्य
मेंदूच्या पेशी दिवसभर ग्लुकोज पुरवण्याचे काम करतात. त्यांच्यामध्ये ग्लुकोज साठवले जात नाही. ग्लुकोज हा मेंदूच्या पेशींसाठी ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत आहे. मेंदूच्या कार्यासाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी विविध धान्यांचा आहारात समावेश करा.
मेमरी सुधारण्याचे इतर मार्ग
दररोज काही ना काही नवीन शिकत राहा. यामुळे मन सक्रीय राहील. आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होईल. नियमित नवीन काहीतरी वाचत राहा. वाचनाच्या गोडीमुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल. यासोबतच योग आणि ध्यानाला बसा. योग आणि ध्यानामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते.