Join us   

तल्लख बुद्धी - उत्तम स्मरणशक्तीसाठी खा ४ पदार्थ; साठीतही राहील सगळं लक्षात; ब्रेन बनेल संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 4:52 PM

4 Best Foods To Improve Brain Health and Memory : मेंदूला तीक्ष्ण करणारे ४ पदार्थ प्रत्येक विद्यार्थ्याने खायलाच हवे

वयानुसार लोकांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो (Brain Health). साठीनंतर स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांचा धोका जास्त वाढतो. वारंवार विसरणे, गोष्टी लक्षात न राहणे, यामुळे काम करणं कठीण होतं (Health Tips). मेंदू कायम तीक्ष्ण ठेवण्यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पण आहारात देखील काही बदल केल्याने मेंदू तीक्ष्ण होऊ शकतो.

या ४ पदार्थांमध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे दीर्घायुष्यासाठी, मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतील. मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?(4 Best Foods To Improve Brain Health and Memory).

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी, आहारात भरपूर फळे, भाज्या, धान्य आणि सुका मेव्याचा समावेश करावा. 

मासिक पाळी सतत अनियमित? ४ प्रकारची फळं नेहमी खा, मासिक पाळी नियमित यायला हवी तर..

मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?

- हिरव्या पालेभाज्या मेंदूसाठी फायदेशीर मानल्या जातात, कारण या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की या भाज्या दीर्घायुषी स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.

- बेरी मेंदूसाठी फायदेशीर मानली जाते. बेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्सचे प्रमाण जास्त असल्याकारणाने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. चेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी यांसारख्या बेरीमध्ये ॲन्थोसायनिन्स असतात. ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होऊ शकतो.

- अळशीच्या बिया, एवोकॅडो, बदाम आणि अक्रोडातही ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स चांगल्या प्रमाणात असतात. ज्याचा फायदा मेंदूला होतो. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते.

तैवानची ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती म्हणते, ‘दंगल’ हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा, कारण..

- चहा आणि कॉफी मेंदूसाठी उत्तम मानले जाते. या पेयांमध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असते. जे मेंदू तीक्ष्ण आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य