Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत न चुकता ‘या’ ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत...

थंडीत न चुकता ‘या’ ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत...

4 Body Part You Must Apply Ghee For Good Health During Winter Season : Gear up for a Healthy Winter with Healthy Ghee : Benefits Of Massaging With Desi Ghee In Winter : हिवाळ्यात तब्येत कमवा, तूप खा-आणि तुपाची मालिशही करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 17:48 IST2024-12-14T17:31:39+5:302024-12-14T17:48:26+5:30

4 Body Part You Must Apply Ghee For Good Health During Winter Season : Gear up for a Healthy Winter with Healthy Ghee : Benefits Of Massaging With Desi Ghee In Winter : हिवाळ्यात तब्येत कमवा, तूप खा-आणि तुपाची मालिशही करा.

4 Body Part You Must Apply Ghee For Good Health During Winter Season Gear up for a Healthy Winter with Healthy Ghee Benefits Of Massaging With Desi Ghee In Winter | थंडीत न चुकता ‘या’ ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत...

थंडीत न चुकता ‘या’ ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत...

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक (4 Body Part You Must Apply Ghee For Good Health During Winter Season) असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात साजूक तूप खाणं महत्त्वाचं असतं(Benefits Of Massaging With Desi Ghee In Winter).

शरीरासाठी आवश्यक असलेलं साजूक तूप आपल्या आरोग्याप्रमाणेच शरीराच्या अवयवांवर लावून मालिश करण्याने देखील अनेक फायदे मिळतात. अस्सल घरगुती साजूक तूप आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी एक चांगला आयुर्वेदिक प्राचीन उपाय आहे. तूप हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचा मऊ आणि चमकदार करण्यास मदत करते. तुपामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. तुपामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते, वजन कमी होते, शरीराच्या अंगावरील सूज आणि वेदना कमी होते आणि अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होते. असे हे बहुगुणी साजूक तूप (Healthy Winter with Healthy Ghee) आपल्या आहारात रोज खाण्यासोबतच शरीराच्या प्रमुख चार अवयवांसाठी देखील तितकेच फायदेशीर असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ सिद्धार्थ एस कुमार यांनी हरजिंदगीला दिलेल्या मुलाखतीनुसार, हिवाळ्यात आपल्या प्रमुख चार अवयवांना तूप लावून मालिश केल्याने हिवाळ्यात त्याचा बराच फायदा होतो, ते चार अवयव कोणते ते पाहूयात.  

१. पोटाची बेंबी :- रात्री झोपताना बोटांवर थोडेसे तूप घेऊन ते बेंबीत लावून हलकेच दाब देत मसाज करुन घ्यावा. पोटाच्या बेंबीत तूप लावल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि पोटाचे आजार दूर होतात. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटाची सूज आणि वेदना कमी होते. तसेच वजन कमी होते, कारण तूप पचनशक्ती वाढवते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढवते. तसेच तुपातील प्रथिने नाभीभोवतीचे स्नायू मजबूत करतात. त्याचबरोबर नाभीमध्ये तूप लावल्याने त्वचा निरोगी होते, कारण ते त्वचेला मॉइश्चरायझ करते, ज्यामुळे त्वचा रोग टाळता येतात. नाभीत तूप लावल्याने हार्मोन्स संतुलित राहतात, कारण ते पिट्यूटरी ग्रंथी निरोगी ठेवते, ज्यामुळे प्रजनन आरोग्य चांगले राहते.

हिवाळ्यात थंडीमुळे हुडहुडी भरते? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते थंडी पळवण्यासाठी खास ३ योगासनं...

२. नाक :- बोटांवर थोडेसे तूप घेऊन दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. त्याचबरोबर बोटाने नाकपुड्यांच्या तोंडाशी मसाज करावा. नाकावर तूप लावल्याने नाकाचे आजार दूर होतात आणि सायनसच्या समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे नाकात बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करतात. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे नाकातील सूज आणि वेदना कमी होते. तसेच तुपात व्हिटॅमिन 'ई' असते, जे नाकाच्या वास घेण्याच्या क्षमतेला वाढवण्यास मदत करते. तुपामध्ये फॅटी ॲसिड असते, जे नाकाच्या त्वचेला मॉइश्चराईझ करते. 

३. डोळे :- बोटांवर थोडेसे तूप घेऊन डोळ्यांच्या अवतीभवती लावून हलक्या हाताने मसाज करावा. तुपामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'ई' सारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. याव्यतिरिक्त, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे डोळ्यांचा थकवा दूर करतात. तुपात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे डोळ्यांचे आजार टाळता येतात. याशिवाय यामध्ये फॅटी ॲसिड असते, जे डोळ्यांच्या त्वचेला मॉइश्चराईझ करते, त्यामुळे डोळ्यांमध्ये आर्द्रता टिकून राहते.  

खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

४. तळपाय :- दोन्ही तळ हातांवर चमचाभर तूप घेऊन ते पायांच्या तळव्याला लावून हलकेच मसाज करुन घ्यावा. पायाला तूप लावल्याने पायाचे आजार दूर होतात आणि पायाला आराम मिळतो. कारण तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे पायांची सूज आणि वेदनाही कमी होतात. तुपात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे पायांच्या आजारांपासून बचाव करतात. याव्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन 'ई' असते, जे पायांच्या नसा मजबूत करते. पायाला तूप लावल्याने मन शांत होते, कारण ते पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते (हा मज्जासंस्थेचा भाग आहे जो ग्रंथीसारख्या अंतर्गत अवयवांवर नियंत्रण ठेवतो).

शरीराच्या या भागांवर तूप लावल्याने शरीराच्या अवयवांचे आरोग्य तर सुधारतेच, पण तुमची त्वचाही चमकदार आणि निरोगी होते.

Web Title: 4 Body Part You Must Apply Ghee For Good Health During Winter Season Gear up for a Healthy Winter with Healthy Ghee Benefits Of Massaging With Desi Ghee In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.