Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मांडीवर मांडी घासून त्वचा लाल झाली? सतत खाजही येते? ४ घरगुती उपाय; त्वरित मिळेल आराम

मांडीवर मांडी घासून त्वचा लाल झाली? सतत खाजही येते? ४ घरगुती उपाय; त्वरित मिळेल आराम

4 Causes of Itchy Legs and What to Do About It : पावसाळ्यात मांड्यांभोवती उठलेल्या खाजेमुळे त्रस्त आहात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 05:47 PM2024-09-10T17:47:50+5:302024-09-10T17:48:57+5:30

4 Causes of Itchy Legs and What to Do About It : पावसाळ्यात मांड्यांभोवती उठलेल्या खाजेमुळे त्रस्त आहात?

4 Causes of Itchy Legs and What to Do About It | मांडीवर मांडी घासून त्वचा लाल झाली? सतत खाजही येते? ४ घरगुती उपाय; त्वरित मिळेल आराम

मांडीवर मांडी घासून त्वचा लाल झाली? सतत खाजही येते? ४ घरगुती उपाय; त्वरित मिळेल आराम

हवामानात बदल झाल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या शरीर आणि आरोग्यावरही होतो (Skin Care Tips). सध्या पावसाळा सुरू आहे. हवामानात आर्द्रता वाढते (Itchy Legs). आर्द्रतेमुळे शरीराला खूप घाम येतो. घामावर नियंत्रण ठेवले नाही किंवा वेळोवेळी पुसले गेले नाही तर, त्या भागात खाज सुटणे आणि पुरळ उठण्याची समस्या सुरू होते. मुख्य म्हणजे मांड्यांभोवतीही खाज वाढते.

यासंदर्भात, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचा तज्ज्ञ, डॉ. जतीन मित्तल सांगतात, 'पावसाळ्यात त्वचेच्या निगडीत समस्या कॉमन आहे. यामागे अनेक कारणं आहेत. जसे की संपूर्ण शरीराला घाम येणे. पावसाळ्यात शरीराच्या काही भागांमध्ये जास्त घाम येतो. ज्यामध्ये मांड्याचाही समावेश आहे. मांड्याला मांडी घासल्याने रॅशेज आणि खाज उठते. यावर काही वेळेत उपाय करणं गरजेच आहे'(4 Causes of Itchy Legs and What to Do About It).

मांड्यांभोवती खाज आल्यास उपाय

स्वच्छतेची काळजी घ्या

डॉ.जतिन मित्तल सांगतात, खाज सुटणे, पुरळ उठणे इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवसांमध्ये दोन वेळेस आंघोळ करा. अंडरवियर दररोज बदला. त्वचेची कोणतीही समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

पांढरे केस डायशिवाय होतील काळे, फक्त ४ पैकी १ पदार्थ न चुकता खा; केस होतील दाट - दिसतील सुंदर

ओले कपडे घालू नका

पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत. परंतु, ओले कपडे घालू नका. ओल्या कंपड्यांमुळे स्कीन आणखीन खराब होऊ शकते. यामुळे त्वचेच्या समस्या, खाज सुटणे आणि रॅशेसमुळे स्कीन आणखीन लाल होते.

गोष्टी शेअर करणे टाळा

आपल्याला त्वचेशी संबंधित समस्या असल्यास, स्वतःच्या गोष्टी शेअर करणे टाळा. विशेषतः, टॉवेल, कपडे किंवा वैयक्तिक वस्तू. त्याच वेळी, इतर कोणाला अशा प्रकारची समस्या असल्यास, त्यांच्या वस्तू वापरू नका.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

अँटी-फंगल पावडर लावा

त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी आपण अँटी फंगल पावडर वापरू शकता. हे विशेषतः अशा लोकांसाठी प्रभावी आहे ज्यांना खूप घाम येतो. अँटी फंगल पावडरमुळे घाम जास्त येत नाही. ज्यामुळे खाज किंवा पुरळही उठत नाही. जर आपल्याला जास्त घाम येत असेल तर, अँटी फंगल पावडरचा वापर करा. 

Web Title: 4 Causes of Itchy Legs and What to Do About It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.