आपल्या शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हार्मोन्सचे संतुलित असणे गरजेचं आहे. हार्मोनल इम्बॅलन्समुळे शरीरात अनेक लक्षणे निदर्शनास येतात. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. अनेकदा लोकं या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे ही समस्या आणखी वाढू लागते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हार्मोनल असंतुलनाची समस्या निर्माण होते. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
महिलांसाठी हार्मोन्सचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. कारण हार्मोन्सच्या असंतुलनाचा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर आणि प्रजनन क्षमतेवर होतो. जीवनशैलीतील बदल हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करू शकतात. यासंदर्भात, हरजिंदगी या वेबसाईटला माहिती देताना, पोषणतज्ज्ञ सिमरन कौर यांनी हार्मोनल संतुलनासाठी कोणते टिप्स फॉलो करावे याची माहिती दिली आहे(4 Common Signs of Hormonal Imbalance in Women).
मेडिटेशन
रोज सकाळी १५ मिनिटे मेडिटेशन करा. याशिवाय सकाळी सुमारे ३० मिनिटे व्यायामही करा. व्यायामामुळे पचनक्रिया सुधारते व स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. व्यायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यासही मदत होते. याशिवाय ध्यानामुळे तणाव दूर होतो.
एक ग्लास दुधात मिसळा एक चमचा तूप, सांधेदुखीपासून पचनक्रिया सुधारण्यापर्यंत ३ भन्नाट फायदे
नाश्त्यापूर्वी या गोष्टी खा
तज्ज्ञांच्या मते, भिजवलेले काजू - बदाम आणि इतर बिया प्री- ब्रेकफास्टमध्ये खाव्यात. यामुळे दिवसभर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, तसेच हार्मोन्सही संतुलित राहतात.
नाश्ता असाच असावा
अयोग्य आहारामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होते. आपले पचन, स्ट्रेस, मनःस्थिती आणि ऊर्जा, जवळजवळ सर्व काही हार्मोन्सशी संबंधित आहे. नाश्ता अजिबात स्किप करू नका. नेहमी प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा. यामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होईल.
नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा
वेळेवर जेवा
व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक लोकं वेळेवर जेवत नाही. आपण कधीही काहीही खातो. ज्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. काही लोकं जेवल्यानंतर लवकर झोपत नाही. रात्रभर जागतात. याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. त्यामुळे जेवणाची वेळ निश्चित करा. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर करा.