Join us   

४ प्रकारचे पौष्टिक दूध, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल कमी, रक्ताभिसरण सुधारेल-हार्ट ॲटॅकचा धोका कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 1:44 PM

4 drinks that could help lower cholesterol : कमी वयात हृदयाचे आजार होऊ नयेत म्हणून प्या ४ प्रकारचे दूध, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) समस्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बॅड कोलेस्टेरॉल ज्याला एलडीएल कोलेस्टेरॉल देखील म्हणतात, हा एक मेणासारखा चिकट पदार्थ असतो, जो नसांमध्ये आढळतो. बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यामागे अनेक करणे असू शकतात. मुख्य म्हणजे चुकीच्या अन्न पदार्थांमुळे ही समस्या उद्भवते. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होते. ज्यामुळे रक्तपुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होते. शिवाय विविध आजारही निर्माण होतात.

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फक्त औषधोपचार गरजेचं नसून, सोबत आहाराकडेही (Diet) विशेष लक्ष द्याला हवे. ज्यांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांना गाय-म्हशीचे दूध (Milk) पिण्यास टाळायला सांगतात. कारण त्यात फॅट्सचे प्रमाण जास्त असते. पण आपण गाय-म्हशीच्या दुधाऐवजी ४ प्रकारच्या दुधाचा आहारात समावेश करू शकता(4 drinks that could help lower cholesterol).

ओट्स मिल्क

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, ज्यांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारात ओट्स मिल्कचा समावेश करावा. गाय-म्हशीच्या दुधात असलेल्या फॅट्सच्या तुलनेत. ओट्स मिल्कमध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, शिवाय हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

ब्लडप्रेशर-डायबिटिस असेल तरी खा सीताफळ, त्वचेसह आरोग्यासाठी वरदान असलेले मधूर फळ!

बदाम दूध

बदाम आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित बदाम खाण्य़ाचा सल्ला तज्ज्ञ देतात. आपण आपल्या आहारात बदाम दुधाचा समावेश करू शकता. बदामामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते.

सोया मिल्क

उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांसाठी सोया मिल्क फायदेशीर ठरते. सोया मिल्कमध्ये फॅट्स नसते. शिवाय त्यात विटामिन बी१२, प्रोटीन, सोडियम, फायबर, पोटॅशियम, फॅटी एसिड, फॉस्फोरस, आयरन आणि मिनरल्स असतात. जे हाडांसाठीही फायदेशीर ठरते.

शरीरात वाढेल उर्जा, मसल्स होतील स्ट्राँग, फक्त रोज एक प्रोटीन बार खा, पाहा प्रोटीन बार करण्याची सोपी कृती

काजू दूध

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फक्त बदाम दूध उपयुक्त ठरत नसून, काजू दूध देखील फायदेशीर ठरते. काजूच्या दुधात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूपच कमी असते, शिवाय हे एक अनसॅच्युरेटेड फॅट्सचे उत्तम स्त्रोत आहे. ज्यांना हाय कोलेस्टेरॉलची समस्या आहे, त्यांनी आपल्या आहारात काजू दुधाचा अवश्य समावेश करावा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य