Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ४ उपाय, पोट होईल नियमित साफ

पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ४ उपाय, पोट होईल नियमित साफ

4 Easy Solutions for Constipation Problem : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनित बत्रा सांगतात, पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी...   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 01:54 PM2023-02-16T13:54:45+5:302023-02-16T16:07:30+5:30

4 Easy Solutions for Constipation Problem : प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनित बत्रा सांगतात, पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी...   

4 Easy Solutions for Constipation Problem : Have problems with bowel movements? Experts say 4 simple solutions, the stomach will be cleaned regularly | पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ४ उपाय, पोट होईल नियमित साफ

पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ४ उपाय, पोट होईल नियमित साफ

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनित बत्रा पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासोबत शेअर करतात (4 Easy Solutions for Constipation Problem). 

१. दही आणि जवस 

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटीक घटक असतात, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. तर जवसामध्ये सोल्यूबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ठा मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे जवसाची चटणी, लाडू या गोष्टींचाही आहारात समावेश असावा.

२. आवळा ज्यूस 

३० मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करुन सकाळी उठल्या उठल्या घेतला तर पोट साफ होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. 

३. दूध आणि तूप 

तूप हे शरीरात वंगणासारखे काम करते. त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून रात्री झोपताना कपभर गरम दुधात १ चमचा तूप घालून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. पालेभाज्या 

पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यांमध्ये फक्त फायबरचे प्रमाण जास्त असते असे नाही. तर या भाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात. या घटकांमुळेही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. म्हणून आहारात पालेभाज्यांचा समावेश अवश्य करायला हवा. 

Web Title: 4 Easy Solutions for Constipation Problem : Have problems with bowel movements? Experts say 4 simple solutions, the stomach will be cleaned regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.