सध्याच्या काळात वजन वाढीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत (Health tips). पोटावरची चरबी वाढली की, कपडेही व्यवस्थित बसत नाही. तर दुसरीकडे असेही काही लोकं आहेत, ज्यांचं काहीही खाल्लं तरी वजन वाढत नाही (Weight Gain). वजन वाढत नसलं तर, आपण महागडे प्रॉडक्ट्स दुधात घालून पितो (Milk). पण तरीही वजन वाढत नाही. हाडकुळ्या शरीरामुळे बरेच लोक चारचौघात हिणवतात.
दुबळेपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर, दुधात ४ गोष्टी घालून प्या. दुधात कॅल्शियमसोबतच कॅलरी, प्रथिने आणि इतर पोषक घटकही चांगल्या प्रमाणात आढळतात. शिवाय यात या ४ गोष्टी घालून प्यायल्याने वजन वाढण्यास मदत होते. या ४ गोष्टी नक्की कोणत्या आहेत? याचा फायदा आरोग्याला कशारित्या होतो? नैसर्गिकरित्या वजन कसे वाढेल? पाहूयात(4 Food Groups to help gain weight quickly and safely including Milk).
वजन वाढण्यासाठी दुधामध्ये कोणते पदार्थ घालून खावे?
मध आणि दूध
मध आणि दूध हे उत्तम मिश्रण मानले जाते. दुधासोबत मधामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही चांगले असते. ज्यामुळे मसल्स वाढण्यास मदत होते. मधामध्ये नैसर्गिक साखरही असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते, आणि चयापचय बुस्ट होते. यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी दुधात मध घालून पिऊ शकता.
ब्रेकअप झालं आणि तुमचा देवदास झाला? ३ गोष्टी करा, पडा स्वत:च्या प्रेमात-जगा आनंदात
केळी आणि दूध
केळी वजन वाढवण्यास मदत करते. केळ आणि दुधामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फॉलिक ॲसिड, प्रोटीन, लोह, पोटॅशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात. जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर, दुधात केळी घालून खाऊ शकता. आपल्याला हवं असल्यास त्यात ड्रायफ्रुट्स किंवा बदाम घालून खाऊ शकता.
अंजीर आणि दूध
अंजीरमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीर मजबूत होते. जर आपल्याला वजन वाढवायचं असेल तर, दुधात अंजीर भिजवून खा. यामुळे वजन तर वाढतेच शिवाय शरीरातील ऊर्जा पातळी वाढते.
सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत
खजूर आणि दूध
खजूरमुळेही वजन वाढण्यास मदत होते. यात फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी यासह इतर पौष्टीक घटक असतात. दुधासोबत साधे खजूर खाल्ल्यानेही शरीराला पोषण मिळते. खजूर उकळून दुधात मिसळून प्यायल्यास जास्त फायदा होतो. वजन वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर ठरते.