Join us   

फक्त ब्रशने घासून दात मजबूत होत नाहीत; यासाठी ४ पैकी १ गोष्ट रोज खा; दुधासारखी बत्तीशी दिसेल शुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 5:57 PM

4 Foods and Drinks That Whiten Teeth and Improve Oral Health : दूध आणि दहीच नाही तर, हे ४ पदार्थ खाल्ल्यानेही दात मजबूत होतात..

उत्तम आरोग्यासाठी निरोगी दात आणि हिरड्या निरोगी असणं गरजेचं आहे (Teeth Cleaning). हिरड्या जर अनहेल्दी असतील तर, तोंडाचे आरोग्यही बिघडते. यामुळे श्वासाची दुर्गंधी, रक्तस्त्राव, दात पिवळे पडणे, थंड किंवा गरम अन्न खाताना मुंग्या येणे, पायोरिया, कॅव्हिटी, दातांमध्ये किडे होणे, हिरड्यांमधून रक्त येणे यासह इतर समस्या निर्माण होतात (Oral Health).

दातांची संपूर्ण रचना हिरड्यांवर असते. हिरड्या कमकुवत झाल्यास दात देखील कमकुवत होतात. त्यामुळे ओरल हेल्थची काळजी घ्यायला हवी. यासाठी आहारात ४ पदार्थांचा समावेश करा. पदार्थातील कॅल्शियम दातांमधील पोकळी, हिरड्यांवरील सूज, वेदना आणि रक्तस्त्राव या समस्या दूर करतील(4 Foods and Drinks That Whiten Teeth and Improve Oral Health).

डार्क चॉकलेट

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'लहान मुलांना आपण दात किडतील म्हणून चॉकलेट खाण्यास मनाई करतो. पण आपण त्यांना डार्क चॉकलेट खायला देऊ शकता. डार्क चॉकलेटमुळे दात किडणार नाहीत तर मजबूत होतील. डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असते, ज्यामध्ये टॅनिन असते. हे दात मजबूत करते आणि हिरड्यांमधील सूज दूर करते.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

सफरचंद

सफरचंदमध्ये भरपूर लोह असते, त्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. याचा फायदा दातांनाही होतो. सफरचंद तोंडातील लाळ निर्माण होण्याची प्रक्रिया वाढवते. ज्यामुळे दातांमध्ये पोकळी होत नाही. सफरचंदमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळते, जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात. ज्यामुळे दातही स्वच्छ राहतात.

संत्री

संत्री हे व्हिटॅमिन सी चा मुख्य स्त्रोत आहे. यासह यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी देखील असते. शिवाय यात दात निरोगी ठेवणारे घटकही असतात. संत्र्याचा रस प्यायल्याने तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे तोंड स्वच्छ होते. संत्र्याच्या रसामध्ये नैसर्गिक अॅसिड असते. त्यामुळे हा रस प्या आणि नंतर दात घासा. याने दात चमकतील.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

काजू

काजूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी असतात. शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड इत्यादींमध्ये दात आणि हिरड्या निरोगी ठेवणारे अनेक घटक असतात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम, उच्च फायबर, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि बी६ दातांना मजबूत ठेवतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्वच्छता टिप्स