Join us   

केळी रोज खाता, पण त्यासोबत 'हे' ४ पदार्थही खाता? पोट बिघडलेच म्हणून समजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 4:21 PM

4 Foods One Must Avoid Eating With Bananas : केळीसोबत 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, तब्येत बिघडेल.

केळी आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता (Health Tips). बरेच जण केळी दररोज खातात. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काही लोक पिकलेली किंवा कच्चेही केळी खातात (Banana). केळीमध्ये व्हिटॅमिन, आयर्न, अँटी ऑक्सिडंटचे प्रमाणही जास्त असते. शिवाय यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते. पिकलेल्या केळी पोटातील जळजळ आणि अपचन दूर करतात.

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी केळी फायदेशीर ठरते. केळीचे एक - दोन नव्हे, तर अनेक फायदे आहेत. पण पिकलेल्या केळीसोबत काही पदार्थ खाणं टाळावे. ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी केळीसोबत नेमकं कोणते पदार्थ खाणं टाळावे. याची माहिती दिली आहे(4 Foods One Must Avoid Eating With Bananas).

केळी आणि दूध

केळीमध्ये नैसर्गिकरित्या प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी यांसारख्या इतर आवश्यक खनिजे असतात. यामुळे पोट भरते, शिवाय हे एक पौष्टीक फळ आहे. पण केळी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नये. यामुळे कफ आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. कारण दूध हे पचनास जड असतात.

आंबट ढेकर येतात, सतत लाळ गळते? 'या' ४ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण..

केळी आणि कलिंगड

काही लोकांना फ्रुट चाट खायला आवडते. त्यात केळी आणि कलिंगड देखील असते. कलिंगड लवकर पचते, पण केळी पचायला वेळ घेते. ज्यामुळे गॅस, पोट फुगणे यांसारखे समस्या निर्माण होतात.

केळी आणि हाय प्रोटीन फूड

केळीसोबत हाय प्रोटीन पदार्थ टाळावे असा सल्ला दिला जातो. केळी हे कार्बोहायड्रेटयुक्त फळ आहे आणि ते प्रथिनेयुक्त पदार्थांसह खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते.  ज्यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.

रोज खा एक 'खजूर'! बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; रक्ताभिसरण वाढेल - थकवाही होईल दूर

केळी आणि दही

दुधाप्रमाणेच दही देखील दुग्धजन्य पदार्थ आहे आणि त्यामुळे केळीसोबत खाणे टाळावे. दही आणि केळी एकत्र खाल्ल्यास काही वेळा पचनास त्रास होऊ शकतो. केळीतील नैसर्गिक साखर दह्यातील असलेलल्या अॅसिडसोबत मिसळत नाही. ज्यामुळे गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्नआरोग्य