Join us   

फोर्टिफाइड धान्य म्हणजे नेमकं काय? कडकड वाजणारी हाडं ही धान्य खाऊन बळकट होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 3:05 PM

4 Foods That Are High in Vitamin B12 : कॅल्शियम-व्हिटॅमिन बी १२ या कमतरतांमुळे होणारे आज धान्य बदल करुन टाळता येतात?

उत्तम आरोग्यासाठी शरीराला अनेक पौष्टीक घटकांची गरज असते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण उलट - सुलट पदार्थ खातो. ज्यामुळे वजन तर वाढतेच, सोबत आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. व आहारातून शरीराला योग्य पोषणही मिळत नाही. प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी प्रमाणेच व्हिटॅमिन बी देखील शरीरासाठी आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी १२ एक शक्तिशाली पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. जे रक्त तयार करणाऱ्या लाल रक्तपेशींचे उत्पादन करते. यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही कार्य करते(4 Foods That Are High in Vitamin B12).

शरीरातील कार्य उत्तम चालावे, यासाठी २.४ एमसीजी व्हिटॅमिन बी१२ ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी १२ हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. हे अॅनिमियापासून बचाव करते, तसेच शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा देते. शरीरातील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे याची माहिती आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी दिली आहे.

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

फोर्टिफाइड धान्य

फोर्टिफाइड धान्यांमध्ये व्हिटॅमिन बी १२ तसेच फोलेट, लोह आणि व्हिटॅमिन ए जास्त असते. आपण आपल्या आहारात गव्हाचा समावेश करू शकता. यात व्हिटॅमिन बी १२चे प्रमाण जास्त असते.

फोर्टिफाइड नॉन-डेअरी दूध

शरीराला व्हिटॅमिन बी १२ हे जीवनसत्व मिळावे, यासाठी आहारात सोया दूध किंवा बदामाच्या दुधाचा समावेश करावा. हे दूध व्हिटॅमिन बी १२चे उत्तम स्त्रोत आहे. एक कप सोया दूध किंवा बदामाच्या दुधात २.१ एमसीजी व्हिटॅमिन बी १२ असते.

फोर्टिफाइड यीस्ट

फोर्टिफाइड यीस्टमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ आढळते. एक चमचा यीस्टमध्ये २.४ एमसीजी व्हिटॅमिन बी १२ असते. आपण आपल्या आहारात याचा समावेश करू शकता.

दररोज मुठभर भाजलेले चणे खाण्याचे ६ फायदे, फक्त स्नॅक्स म्हणून खाऊ नका - आनंदाने खा पोटभर

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि मटार हे व्हिटॅमिन बी १२चे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे नियमित याचे सेवन करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य