Join us   

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज खा ४ गोष्टी, LDL कोलेस्टेरॉल होईल कमी - राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 6:17 PM

4 Foods that Lower Cholesterol - Harvard Health Publishing : त्रासदायक कोलेस्टेरॉल कमी करणारे ४ पदार्थ

हल्ली जंक फूड (Junk Food) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय सणवार जवळ आल्यानंतर आपलं खाणं होतंच (Festival). दिवाळीत प्रत्येकाने चमचमीत आणि तेलकट पदार्थ खाल्ले असतील (Bad Cholesterol). पण अति प्रमाणात खाल्ल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो. शिवाय बॅड कोलेस्टेरॉलचीही (Health Tips) पातळी वाढते. बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की ब्लड सर्क्युलेशनमध्येही अडथळे येतात.

हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, संतुलित आहारामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. यासह हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोकाही कमी होतो. यासंदर्भात, आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा म्हणतात, 'बॅड कोलेस्टेरॉल वाढण्यामागे असंतुलित आहार कारणीभूत ठरते. त्यामुळे आहारावर लक्ष केंद्रित करायला हवे.' बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नेमके कोणते पदार्थ खावे? पाहा(4 Foods that Lower Cholesterol - Harvard Health Publishing).

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे पदार्थ

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये पाण्यामध्ये विरघळणारे फायबर आढळतात. जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. जेवणापूर्वी पाण्यात मिसळून प्यायल्यास याचा फायदा आरोग्याला होतो.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे हृदयाला गंभीर आजारांपासून वाचवण्यात आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत होते. यासाठी नियमित सकाळी २ अक्रोड खा.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे प्रमाण जास्त असते. जे जळजळ कमी करून एलडीएलची कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यास मदत करते. आहारात आपण चिया सीड्सचा समावेश करू शकता.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

आले

रक्तप्रवाहात जमा झालेले खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचे आणि जळजळ कमी करण्याचे काम आलं करते. आपण आल्याचा वापर विविध पदार्थांमध्येही करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य