Join us   

फ्रिजमध्ये ठेवू नका ‘या’ ४ भाज्या, पाहा त्यानं होतं काय, पावसाळ्यात आजारपणाला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 10:11 AM

4 Foods That You Should Never Refrigerate During Monsoon : पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवू नयेत ४ भाज्या

साधारणपणे आपण सर्व खाद्यपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो (Monsoon). भाज्या किंवा फळं फ्रेश ठेवण्यासाठी नेहमीच लोक फ्रिजचा वापर करतात. ज्यांना दररोज मार्केटमध्ये जाऊन फळे - भाज्या आणायला वेळ नसतो (Health care). ते लोक भाज्या, फळे आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात (Refrigerate). फ्रिजमध्ये या गोष्टी बराच वेळ फ्रेश राहतात. पण प्रत्येक भाजी फ्रिजमध्ये ठेवू नये. स्पेशली पावसाळ्यात.

यामुळे भाजीचा सुगंध, रंग आणि चव बिघडू शकते. शिवाय ही भाजी खाल्ल्यानंतर आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा यांनी कोणत्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने विषारी होतात याची लिस्ट शेअर केली आहे. या भाज्या शक्यतो फ्रिजमध्ये ठेवणं टाळावे(4 Foods That You Should Never Refrigerate During Monsoon).

आले

आलं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होतात. त्यावर बुरशी तयार होतात. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीला धोका निर्माण होऊ शकतो. आलं खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. जे खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

पांढऱ्या शर्टाच्या कॉलरवरचे हट्टी डाग घासूनही निघत नाही? फक्त २ उपाय; कपडे दिसतील चकाचक

लसूण

सोललेला लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यावर बुरशी निर्माण होऊ शकते. यामुळे तब्येत बिघडू शकते. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील तेलही नष्ट होते. ज्यामुळे चवही बिघडते. त्यामुळे जेवढी गरज आहे, तेवढाच लसूण सोला.

कांदा

अनेकदा लोक अर्धा कांदा कापून उरलेला अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात. पण उरलेला अर्धा कांदा खाऊ नये. कारण फ्रिजमधल्या आजूबाजूच्या वातावरणातील सर्व हानिकारक जीवाणू कांद्यामध्ये प्रवेश करता. शिवाय बुरशी तयार होते. त्यामुळे अर्धा चिरलेला कांदा खाणं टाळावे.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

बटाटे

बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्याचा पोट आणि चव खराब होते. त्यामुळे बटाटे फ्रिजमध्ये न ठेवता कागदाच्या पिशवीत गुंडाळून एका टोपलीमध्ये ठेवा. 

टॅग्स : मोसमी पाऊसहेल्थ टिप्स