Join us   

४ ‘असे’ पदार्थ, जे सकाळी खाल्ले तर चांगले, पण रात्री खाल्ले तर तब्येत बिघडते, असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 4:22 PM

4 Foods to Avoid Before Bed : रात्री अजिबात खाऊ नयेत असे ४ पदार्थ

उत्तम आरोग्यासाठी पौष्टीक आहाराचे सेवन करणं गरजेचं आहे. मात्र, धावपळीच्या या जीवनात अनेकांना पौष्टीक आहार अथवा वेळेवर जेवण करायला मिळत नाही. बऱ्याच जणांची जेवणाची वेळ ही चुकतेच. ज्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.  मात्र, असेही काही पदार्थ आहेत, जे दिसायला हेल्दी दिसतात, पण शरीरात पौष्टीक घटक पुरवतीलच असे नाही.

असे देखील काही पदार्थ आहेत, जे चुकीच्या वेळेस खाल्ल्यास आरोग्याला नुकसान पोहचवू शकतात. प्रत्येक पदार्थ खाण्याची एक वेळ असते. असे ४ पदार्थ आहेत, जे सकाळच्या वेळेस खाणे फायदेशीर ठरू शकते, पण रात्रीच्या वेळेस खाणं टाळायला हवे(4 Foods to Avoid Before Bed).

दही

पौष्टीक घटकांनी परिपूर्ण दही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यातील गुड बॅक्टेरिया पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. नियमित दह्याचा आहारात समावेश केल्याने हाडं मजबूत होतात. शिवाय रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. मात्र, रात्रीच्या वेळेस दही खाणं शक्यतो टाळा. रात्रीच्या वेळेस दही खाल्ल्याने पोटाचे विकार आपल्याला छळू शकतात.

फळ

आपल्या भारतात अनेक प्रकारची फळं मिळतात. प्रत्येक फळांमध्ये विविध पौष्टीक घटक आढळतात. जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मात्र, सूर्यास्तनंतर शक्यतो कोणतीही प्रकारची फळं खाणं टाळा. कारण त्यात कार्बोहायड्रेट आणि साखर असते. ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. शिवाय झोपेमध्ये देखील व्यत्यय येऊ शकते. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळेस फळं खाल्ल्याने गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

फॅटी फूड

रात्रीच्या वेळेस शक्यतो तळकट, मसालेदार पदार्थ खाणं टाळा. तळकट पदार्थ खाल्ल्याने आपले वजन वाढते. कारण रात्रीच्या वेळेस आपली हालचाल कमी होते. शिवाय मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास वाढतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस तळकट-मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

ड्रायफ्रुट्स

सुक्या मेव्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, शुगर, जीवनसत्त्वे, खनिजे यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. तज्ज्ञ देखील सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. मात्र, रात्री सुकामेवा खाणं टाळायला हवे. सुकामेवा संध्याकाळी किंवा रात्री उशिरा खाल्ले तर पोटातील एन्झाईम्स त्यांना तोडण्यास सक्षम नसतात. ज्यामुळे रात्रीच्या वेळेस सुकामेवा लवकर पचत नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य