दिवसाची सुरुवात योग्य आहाराने करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. हेल्दी नाश्ता केल्यामुळे शरीराला ताकद मिळते. व दिवसभर काम करण्याचीही उर्जा मिळते. बहुतांश लोकं नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडा, किंवा चपाती - भाजी खातात. तर काही लोकं ब्रेड - जॅम, चहा - बिस्कीट, पराठा असे पदार्थ खातात. नाश्त्यासाठी अनेक ऑप्शन आहेत. पण कोणता पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे, व कोणता पदार्थ नाश्त्यामध्ये खाणे टाळावा. याची माहिती असणं गरजेचं आहे. जर चुकीच्या पदार्थाने दिवसाची सुरुवात केली तर, आरोग्यावर देखील दुष्परिणाम होऊ शकतात.
न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांच्या मते, ''दिवसभर काम करण्याची उर्जा मिळावी, यासाठी हेल्दी - पौष्टीक नाश्ता खा. प्रोटीनयुक्त व हेल्दी पदार्थ खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची ताकद मिळते. व वारंवार भूकही लागत नाही. परंतु, उत्तम आरोग्य राखण्यासाठी नाश्त्यात ४ गोष्टी खाणे टाळले पाहिजे. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते''(4 foods to avoid eating in the morning).
व्हाईट ब्रेड
काही लोकं नाश्त्यामध्ये टोस्ट - बटर किंवा टोस्ट - चहा खातात. व्हाईट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आढळते. ज्यामुळे पोट भरत नाही. व वारंवार भूक लागते. यात असलेल्या कार्ब्समुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. त्याऐवजी आपण गव्हाच्या पिठाचा ब्रेड खाऊ शकता.
स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा
चहा - बिस्कीट
बिस्किटांमध्ये सामान्यतः रिफाइंड साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. यासह अनहेल्दी सॅच्युरेडेट फॅट्स देखील असते. त्यात कोणतेही पोषक तत्वे आढळत नाही. रिकाम्या पोटी चहा - बिस्कीट खाणे टाळा. यामुळे ॲसिडिटी यासह इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
पॅनकेक
पॅनकेक्समध्ये फॅट्स, साखर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामध्ये फायबर नसते, ज्यामुळे नाश्ता खाल्ल्यानंतर लगेच भूक लागते. यासह रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने अपचन होऊ शकते.
नखं एकमेकांवर घासली तर खरंच नखं वाढतात का? या प्रयोगात नेमकं खरं काय?
पॅक फूड
काही लोकं सकाळी दुधासोबत कॉर्नफ्लेक्स खातात. लहान मुलांनाही देतात. परंतु, यामध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. व प्रोटीन कमी असते. आरोग्याला त्यातून कोणतेही पौष्टीक घटक मिळत नाही.