Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? चुकूनही खाऊ नका हे ४ पदार्थ; आहार चुकला तर..

व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? चुकूनही खाऊ नका हे ४ पदार्थ; आहार चुकला तर..

Avoid 4 Foods while loosing weight वजन कमी करणे हा मोठा टास्कच म्हणावं लागेल, या कालावधीत काही पदार्थ टाळणे योग्य ठरेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 10:50 AM2023-02-14T10:50:13+5:302023-02-14T14:51:42+5:30

Avoid 4 Foods while loosing weight वजन कमी करणे हा मोठा टास्कच म्हणावं लागेल, या कालावधीत काही पदार्थ टाळणे योग्य ठरेल..

4 Foods to Avoid When Trying to Lose Weight, know this | व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? चुकूनही खाऊ नका हे ४ पदार्थ; आहार चुकला तर..

व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? चुकूनही खाऊ नका हे ४ पदार्थ; आहार चुकला तर..

वजन कमी करणं हे खरंच खायचं काम नाही. जिभेचे चोचले कमी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी, कंट्रोल होत नाही. वजन कमी करण्यासाठी जिम किंवा योग क्लासेसला जाऊन तासंतास घाम गाळावे लागते. तेव्हा कुठे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. वजन कमी करण्यासाठी काहींना महिने तर काहींना वर्ष लागतात. मात्र, वजन कमी करत असताना जिभेवर कंट्रोल असणे गरजेचं.

काहींचे वजन काही केल्या कमी होत नाही. अशा परिस्थितीत आपण चुकीचा आहार तर घेत नाही ना हे जाणून घेणं आवश्यक. अनेकदा आपण व्यायामावर पूर्ण जोर लावतो. परंतु, आहाराकडे दुर्लक्ष करतो. काही जण जंक फूडचे देखील सेवन करतात. यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. वजन अधिक वाढण्याची शक्यता निर्माण होते. वजन कमी करत असताना कोणते पदार्थ खावे कोणते खाऊ नये, यासंदर्भात माहिती असणे गरजेचं.

वजन कमी करत असताना या गोष्टी खाणं टाळा

फास्ट फूड - फ्रेंच फ्राईज

विदेशी पदार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर खातात. त्यात फ्रेंच फ्राईजचा देखील समावेश आहे. लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला फ्रेंच फ्राईज हा चटपटीत पदार्थ खायला प्रचंड आवडतो. मात्र, या फास्ट फूडमुळे शरीरात  कोलेस्टेरॉल वाढते. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, वजन कमी करत असताना बटाट्याचे सेवन करू नये. फ्रेंच फ्राईज हा पदार्थ ऑयली असतो. ज्यामुळे शरीरात कॅलरीची मात्रा वाढते. अशा स्थितीत वजन देखील झपाट्याने वाढते.

सॉफ्ट ड्रिंक/एनर्जी ड्रिंक

सॉफ्ट आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक तत्व नसतात. हे  कॅलरी युक्त पेय तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात. शिवाय, हे पेय शरीरातील भूक भागवत नाहीत. अशा स्थितीत आपले शरीर अधिक भूक लागली असल्याचे संकेत देतो.

बेकरी प्रोडक्ट्स

चॉकलेट, जॅम-स्टफ्ड, क्रीमी आणि पावडर शुगर-कोटेट कुकीज, पेस्ट्री, डोनट्स आणि केक वजन कमी करत असताना खाऊ नये. या बेकरी प्रोडक्ट्समध्ये साखर, मीठ, मैदा आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांमुळे पोटात जळजळची समस्या वाढते. या बेकरी प्रोडक्ट्समुळे वजन देखील वाढते.

अल्कोहोल

एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अल्कोहोलमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि त्यामुळे भूकही वाढते. एका ग्रॅम अल्कोहोलमध्ये सुमारे सात ग्राम कॅलरीज असतात. याशिवाय त्यात कोणतेही पौष्टिक मूल्य नसतात. सर्वात मोठा तोटा म्हणजे अल्कोहोल डिटॉक्स करण्यासाठी तुमचे शरीर तुमचे चयापचय बंद करतात.

Web Title: 4 Foods to Avoid When Trying to Lose Weight, know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.