Join us   

हाय बीपी असताना खाल्ले तर हे 'हेल्दी' पदार्थ बनतात सायलेंट किलर; हृदयावरही होतो परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 4:14 PM

4 foods to avoid with high blood pressure : उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे..

उच्च रक्तदाब कोणत्याही वेळी शरीराच्या विविध भागावर परिणाम करू शकतात (Blood Pressure). म्हणून ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर कधीही कमी किंवा वाढू शकते (Health Tips). अशावेळी योग्य जीवनशैली फॉलो करणं गरजेचं आहे. यासह आहारही महत्वाचं आहे. बऱ्याचदा हेल्दी वाटणारे पदार्थही आरोग्यासाठी घातक ठरतात.

मिठामुळे पदार्थाची चव वाढते, पण यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचाही धोका वाढतो. यासंदर्भात, तज्ज्ञ धर्मेश शाह सांगतात, 'ब्लड प्रेशर वाढल्यावर  मीठ आणि साखर कमी प्रमाणात खावी. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.' त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू नये म्हणून कोणते पदार्थ खाऊ नये पाहा(4 foods to avoid with high blood pressure).

या पदार्थांमध्ये सोडियम असते

बऱ्याच हेल्दी पदार्थामध्ये पौष्टीक घटकचे प्रमाण कमी असते. हेल्दी वाटणारे प्रोसेस्ड आणि पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. प्रिझर्वेटिव्ह भाज्या, सूप आणि सॉसमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. या गोष्टी आपल्याला हेल्दी वाटतात, पण हे पदार्थ खाणं टाळावे.

अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न; सोनेरी रंगाच्या लेहेंगा घालून दिसत होती अप्सरा; पाहा देखणे रूप..

पॅकेज्ड पदार्थ

प्री-पॅक केलेले जेवण खाणं टाकावे. त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. आणि साखरेचंही प्रमाण जास्त असते. हे  पदार्थ रक्तदाब वाढवू शकतात आणि नसांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळावे.

साखर खाणं टाळा

ब्लड प्रेशर वाढल्यावर साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो. हेल्दी ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असते.  मीठाप्रमाणे साखरेवरही बीपी नियंत्रित ठेवावा लागतो. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

'हेल्दी' पदार्थांमध्ये फॅट

पॅकेज्ड तेलामध्ये सॅच्युरेडेट फॅट्सचे प्रमाण जास्त असते. याच्या अतिसेवनामुळे बॅड कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अधिक दबाव येतो. त्याऐवजी पदार्थांमध्ये कमी तेलाचा वापर करा.

किचनच्या टाइल्स मेणचट - कळकट झाल्या? पाण्यात मिसळा 'ही' पांढरी पावडर; टाईल्स चमकतील चटकन

मसाले

मसाल्यांमध्ये जास्त सोडियम आणि साखर असते. सोया सॉस, सॅलड ड्रेसिंग, केचपमध्ये जास्त प्रमाणात सोडियम असते. त्याऐवजी घरगुती मसाल्यांचा वापर करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य