Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऐन तारुण्यात हाडं कटकट वाजतात? पंचविशीनंतर रोज खायलाच हवे ४ पदार्थ, चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत-चालाल बेफिकीर

ऐन तारुण्यात हाडं कटकट वाजतात? पंचविशीनंतर रोज खायलाच हवे ४ पदार्थ, चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत-चालाल बेफिकीर

4 foods to eat for healthy bones : हिवाळ्यातही हाडं राहतील मजबूत, खसखससह ३ पदार्थ न चुकता खा, ठणकणाऱ्या हाडांचं दुखणं विसराल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 03:42 PM2023-12-14T15:42:31+5:302023-12-14T15:46:05+5:30

4 foods to eat for healthy bones : हिवाळ्यातही हाडं राहतील मजबूत, खसखससह ३ पदार्थ न चुकता खा, ठणकणाऱ्या हाडांचं दुखणं विसराल..

4 foods to eat for healthy bones | ऐन तारुण्यात हाडं कटकट वाजतात? पंचविशीनंतर रोज खायलाच हवे ४ पदार्थ, चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत-चालाल बेफिकीर

ऐन तारुण्यात हाडं कटकट वाजतात? पंचविशीनंतर रोज खायलाच हवे ४ पदार्थ, चाळीशीनंतरही हाडं राहतील मजबूत-चालाल बेफिकीर

वयानुसार शरीरात बरेच बदल घडतात. मुख्य म्हणजे हाडं ठिसूळ होतात. ज्यामुळे कमी वयात गुडघे, कंबर, पाठ दुखण्याची समस्या वाढते. याव्यतिरिक्त किरकोळ दुखापतीमुळे फ्रॅक्चर तर होतेच (Healthy Bones), शिवाय उभे राहणेही कठीण होते. याचे मुख्य कारण ऑस्टियोपोरोसिस आहे, जे शरीरातून कॅल्शियम शोषून घेते. ऑस्टियोपोरोसिसमुळे हाडे कमकुवत होतात.

मुख्य म्हणजे याची समस्या वाढली तर, हाडांमध्ये छोटे खड्डे तयार होऊन ते दुखू लागतात. हे टाळण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसोबत (Calcium for Bones) सकस आहार घेणं गरजेचे आहे. हाडांना बळकटी मिळावी यासाठी आहारात (Healthy diet for Bones) कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा पाहूयात(4 foods to eat for healthy bones).

खसखस

युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरनुसार, जेवणाची चव वाढवण्यासोबत खसखस आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. खसखस हाडांमधील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते. एक चमचा खसखसमध्ये १२५ मिलीग्राम कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं १० टक्क्यांनी मजबूत होतात. शिवाय यात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे असतात. ज्यामुळे आरोग्याला इतरही फायदे मिळतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फक्त बदाम पुरेसे नाहीत, जीवनशैलीत करा ४ सोपे बदल, मेंदू होईल तेज

बदाम

बदाम फक्त स्मरणशक्ती वाढवत नसून, त्याचे इतरही जबरदस्त फायदे आहेत. नियमित बदाम खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. बदाम हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज, प्रथिने देखील असते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी रात्री पाण्यात भिजलेले बदाम न चुकता खा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी, झिंक इत्यादी पोषक घटक असतात. या भाज्या मेंदूच्या विकासासाठी देखील मदत करतात. शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. ज्यामुळे ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून सुटका होते.

चहा पिताना तुम्हीपण हमखास ८ चुका करताच, चहाचे शौकीन असाल तर 'या' सवयी टाळा!

मशरूम

शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळावे, यासाठी शरीरात व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी यासह कॅल्शियम असते. मशरूमचा वापर करून तयार करण्यात येणारे पदार्थ खाल्ल्याने कर्करोग आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोकाही कमी होतो.

Web Title: 4 foods to eat for healthy bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.