Join us   

नाश्त्याला चुकूनही खाऊ नयेत असे ४ पदार्थ, वजन वाढते - तब्येत बिघडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2023 5:48 PM

4 foods you should avoid eating for breakfast दिवसाची सुरुवात चहासह या ४ पदार्थांनी करू नका, होतील गंभीर आजार - उर्जाही होईल कमी

दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थांनी करावी असा सल्ला अनेकांनी दिला असेल. मात्र, नाश्त्यामध्ये काय खावं काय टाळावं याची माहिती प्रत्येकाला नसते. काही लोकं नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. नाश्ता झाल्यानंतर लगेच चहाचे भुरके मारतात.

परंतु, सकाळी चहा प्यायल्यास अॅसिडिटी, जळजळ आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. चहासह आणखी असे ४ पदार्थ आहेत, जे नाश्त्यावेळी खाऊ किंवा पिऊ नये. काही लोकं काहीही विचार न करता उलट सुलट पदार्थ खातात. ज्यामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वाढते. सकाळी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ टाळावे, याची माहिती ईएसआयसी रुग्णालयातील आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी दिली आहे(4 foods you should avoid eating for breakfast).

फ्राईड फूड टाळा

सकाळची सुरुवात ही कधीही फ्राईड पदार्थांनी करू नये. अनेकांना तळलेले पदार्थ खायला आवडतात. परंतु, तेलकट पदार्थ हे पचायला फार जड असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर जडपणा जाणवू शकतो. अशावेळी आपल्याला दिवसभर अस्वस्थता किंवा सुस्त वाटू शकते.

कितीही प्रयत्न केले तरी सकाळी लवकर जाग येत नाही? रात्री ५ चुका करणे टाळा, आलार्मविना येईल जाग

सकाळी मसालेदार पदार्थ खाऊ नका

अनेकांना मसालेदार पदार्थ खूप आवडतात. मात्र, नाश्त्यामध्ये मसालेदार पदार्थ खाऊ नये. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारखी समस्या निर्माण होऊ शकते. सकाळच्या वेळी पचनसंस्था अॅक्टिव्ह असते. त्यामुळे सकाळी मसालेदार पदार्थ टाळून, हेल्दी पदार्थ खा.

दुग्धजन्य पदार्थ

सकाळी नाश्त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ खाणं सामान्य आहे. परंतु, अतिप्रमाणात दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. हेवी क्रीम ते फॅट दूध आपल्या पचनसंस्थेसाठी जड ठरू शकते. ज्यामुळे पचनाच्या निगडीत समस्या वाढू शकतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खा, पण कमी प्रमाणात खाणे उत्तम ठरू शकते.

मोड आलेले काळे चणे खाल्ल्यानंतर ३ गोष्टी खाणं टाळा, आरोग्यासाठी अपायकारक कारण..

ब्रेड - बटर

घाई - घाईत आपण ब्रेकफास्टमध्ये ब्रेड - बटर खातो. मात्र, नाश्त्यासाठी हे पदार्थ योग्य मानले जात नाही. ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जातात. जे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यात प्रोटीन्सचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जाही कमी होते. ब्रेड बटरमधून शरीराला फक्त कार्ब्स आणि फॅट्स  मिळू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य