वजन कमी करत असताना आपण डाएट फॉलो करतो. डाएटमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्यात विशेष करून आपल्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. फळांचा आहारात समावेश केल्याने, नखांपासून ते केसांच्या टोकापर्यंत अनेक फायदे मिळतात. प्रत्येक फळाचे त्यांचे विशिष्ट गुणधर्म आहेत. मात्र, कधी कधी २ फळे एकत्र खाल्ल्याने शरीराला हानी देखील पोहचू शकते.
यासंदर्भात फॅट टू स्लिमचे डायरेक्टर, न्यूट्रिशनिस्ट व डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा म्हणतात, ''फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. फळांमधील पौष्टीक गुणधर्म शरीरासाठी आवश्यक. मात्र, फळांसह काही खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याच्या सेवनाने पचनक्रियेत अडथळा येण्यासोबतच, इतर गंभीर समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे असे काही फळे आहेत ज्याच्यासोबत इतर फळे खाऊ नये.''
संत्रीसोबत गाजर
गाजर आणि संत्री एकत्र खाऊ नये. जर तुम्हाला ज्यूस पिण्याची आवड असेल तर, गाजर आणि संत्र्याचा ज्यूस एकत्र पिऊ नये. गाजर आणि संत्री एकत्र खाल्याने किडनीशी संबधित समस्या उद्भवू शकते. यासह उष्माघाताची समस्या देखील वाढू शकते.
पपई आणि लिंबू
अनेकांना फळांवर लिंबू पिळून खाण्याची सवय असते. मात्र, पपईवर लिंबू पिळून खाऊ नये. खरंतर पपई आणि लिंबू हे एक घातक मिश्रण आहे. ज्यामुळे अशक्तपणा आणि हिमोग्लोबिन असंतुलित होऊ शकते.
पेरू आणि केळ
अनेकांना फ्रूट चाट खायला आवडते. पेरू आणि केळी यांचा फ्रुट चाटमध्ये समावेश असतो. परंतु पेरू आणि केळ एकत्र खाऊ नये, हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ही दोन फळे एकत्र खाल्ल्याने अॅसिडोसिस, मळमळ, गॅस, डोकेदुखी, यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्या कधीही एकत्र खाऊ नयेत. फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला अवघड असते. फळांसह भाज्यांचे सेवन केल्याने पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे अतिसार, डोकेदुखी, संसर्ग आणि पोटदुखी निर्माण होते.