पान (Betel Leaf) खाण्याचा मोह कोणाला नाही आवरत. काही जण पूजेसाठी तर काही लोकं जेवल्यानंतर पान खाण्याचा आनंद लुटतात. आपल्याला जरी निमित्त म्हणून विड्याचे पान खायला आवडत असले तरी, काही जण नित्य नियमाने पान खातात. हिरव्यागार विड्याच्या पानांना काही ठिकाणी नागवेलीचं पान देखील म्हणतात. विड्याचे पान फक्त जिभेची चव वाढवत नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
आयुर्वेदात (Health Benefits of Betel Leaf) या पानांना खूप महत्त्व आहे. यात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स आणि फिनाइल सारखे अनेक पोषक घटक आढळतात. जे शरीराला अनेक स्वरुपात पौष्टीक घटक पुरवतात. मुख्य म्हणजे शरीरातील इतर दुखणे, सूज, यूरिक अॅसिड यासह पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यातून आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांबद्दल, लखनऊच्या बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांनी माहिती दिली आहे(4 health benefits of chewing paan or betel leaves).
विड्याचे पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे
कण्ट्रोलमध्ये राहते यूरिक अॅसिड
आयुर्वेदाचार्य डॉक्टर जितेंद्र शर्मा सांगतात, 'शरीरातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे धोकादायक मानले जाते. यूरिक अॅसिडवर कण्ट्रोल ठेवण्यासाठी बरेच औषधं बाजारात उपलब्ध आहेत. पण यावर घरगुती उपाय म्हणून आपण विड्याचे पान खाऊ शकता. विड्याचे पान यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यास प्रभावी मानले जाते. आपण जेवल्यानंतर विड्याचे पान खाऊ शकता.
आठवड्यात एकदा सोया चंक्स खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजन होईल कमी मिळेल भरपूर प्रोटीन आणि..
पचनक्रिया सुधारते
बरेच जण जेवल्यानंतर विड्याचे पान खातात. कारण यामुळे पचनक्रिया सुधारते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय पोटाचे विकारही छळत नाही. यासह अल्सरसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते.
हिरड्यांसाठी फायदेशीर
जर एखाद्या व्यक्तीला हिरड्यांवर सूज येणे, किंवा त्यातून रक्त निघणे, यासह इतर समस्या छळत असतील तर, यावर उपाय म्हणून आपण विड्याचे पान खाऊ शकता. खरंतर पानांमध्ये आढळणारे घटक हिरड्यांची सूज कमी करतात. ज्यामुळे हिरड्यांना काही दिवसात आराम मिळतो.
दातांसाठी असरदार
विड्याचे पान दातांसाठी फायदेशीर ठरते. बहुतांश लोकं त्यात पानात सुपारी, तंबाखू, चुना यासह इतर साहित्य घालून खातात. यातील पौष्टीक घटक दातांसाठी फायदेशीर ठरते. शिवाय दातांचे दुखणे, हिरड्यांना सूज, दातांना कीड लागणे, यासह इतर समस्या सोडवण्यास मदत करतात. ही पानं बारीक करून त्यात लिंबू पिळून खाल्ल्यास अधिक फायदा होतो.
गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम
सर्दी खोकल्यापासून आराम
हिवाळ्यात सर्दी, खोकला, इन्फेक्शनचा त्रास हमखास होतो. जर सर्दी, खोकल्यापासून आराम हवं असेल तर, विड्याचे पान बारीक करून त्यात मध मिसळून खा. यामुळे ऋतू बदलांमुळे होणारे आजार दूर होतील.