आपण जे काही खातो त्याचा शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो (Breakfast Foods). विशेषत: सकाळची सुरुवात आरोग्यदायी गोष्टींनी केली तर त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि आरोग्यासाठी एकच नाही तर अनेक फायदे होतात (Health Tips).
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजाही हेच सांगतात. किरण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी केसगळती कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर दिसणाऱ्या मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात कशाने करावी हे सांगितले(4 Healthiest Breakfast Foods, According to Nutritionists).
दिवसाची सुरुवात कोणत्या पदार्थाने केल्यावर आरोग्याला फायदा होतो?
केस गळती रोखण्यासाठी काय खावे?
केस गळतीमुळे सध्या बरेच जण त्रस्त आहेत. जर आपणही या समस्येने त्रस्त असाल तर, कडीपत्ता खाऊन दिवसाची सुरुवात करा. कडीपत्त्यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने समृद्ध असतात, जे केस गळती कमी करतात आणि केसांची वाढ उत्तेजित करतात. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आपण कडीपत्त्याचा हेअर मास्क किंवा आहारात कडीपत्त्याचा समावेश करू शकता.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी शेंगदाणे
गरिबांचा बदाम म्हणून शेंगदाण्याला ओळखले जाते. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे व्हिटॅमिन बी 3, नियासिन, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. शेंगदाणे हे असंतृप्त फॅटी ऍसिडस् आणि फायटोस्टेरॉलचा समृद्ध स्रोत आहे जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ज्यामुळे हृदयही सुदृढ राहते.
ब्लड शुगरवर खोबरेल तेल ठरेल मदतगार
जर ब्लड शुगर नियंत्रणात नसेल तर, आपण खोबरेल तेलाचा आहारात समावेश करू शकता. एक चमचा नारळ तेल प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. खोबरेल तेलामध्ये असलेले एमसीटी फॅट्स स्टोअर करून ठेवत नाहीत. त्याचे रूपांतर उर्जेमध्ये होतं. यासह रक्तातील साखरेच्या वाढीचा धोका देखील कमी होते.
बद्धकोष्ठतेपासून मुक्त करण्यासाठी डाळिंब
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरसह आवश्यक पोषक तत्वे असतात. आपण जर नियमित डाळिंब खात असाल तर, पोटाचे विकार दूर आणि पचनसंस्थाही उत्तम राहू शकते. डाळिंब खाण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.