Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फराळ खाऊन पोट बिघडलं? गॅसेसचा त्रास होतो? ४ घरगुती टिप्स; मिनिटात मिळेल आराम

फराळ खाऊन पोट बिघडलं? गॅसेसचा त्रास होतो? ४ घरगुती टिप्स; मिनिटात मिळेल आराम

4 home remedies for an upset stomach : पोट फुगल्यामुळे खाल्लेलं पचत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 07:30 PM2024-11-08T19:30:41+5:302024-11-08T19:31:33+5:30

4 home remedies for an upset stomach : पोट फुगल्यामुळे खाल्लेलं पचत नाही?

4 home remedies for an upset stomach | फराळ खाऊन पोट बिघडलं? गॅसेसचा त्रास होतो? ४ घरगुती टिप्स; मिनिटात मिळेल आराम

फराळ खाऊन पोट बिघडलं? गॅसेसचा त्रास होतो? ४ घरगुती टिप्स; मिनिटात मिळेल आराम

आजकाल खराब जीवनशैलीमुळे (Lifestyle Changes) आरोग्याच्या अनेक समस्या लोकांना भेडसावत आहेत. यामुळे वजन तर वाढतेच (Weight Gain), शिवाय पचनसंस्था बिघडते आणि गंभीर आजारांचाही धोका वाढतो (Health Tips). मुख्य म्हणजे खाण्याच्या सवयी बिघडल्यावर पोट फुग्ण्याचा त्रास होतो. गॅसमुळे पोट फुगलेले राहते.

ज्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. पोट फुगल्यावर हेल्दी पदार्थ खाऊनही पचत नाही. ज्यामुळे आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटते. पण यावर कोणते उपयुक्त ठरतील? घरगुती उपायांचा वापर करून पोट फुग्ण्याचा त्रास दूर होऊ शकतो का?(4 home remedies for an upset stomach).

पोट फुगणे म्हणजे काय?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, पोट फुगणे म्हणजे पोटात गॅस तयार होणे. पोटात वायू साठल्याने पोटदुखीचा त्रास होतो. जर पोट फुग्ण्याची समस्या असेल आणि ही समस्या दीर्घकाळ राहिली तर, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. किंवा आपण काही घरगुती उपायही करून पाहू शकता.

महिनाभर मीठ सोडल्यानं वजन कमी होते, हे खरं की..? मीठ नेमकं किती खाणं फायद्याचंच..

पोट फुगल्यावर कोणते उपाय उपयुक्त ठरतील?

पुरेसे पाणी प्या

पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि गॅसची समस्या कमी होते. पाणी आतडे स्वच्छ करते आणि मल मऊ करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. आणि गॅसेसचा त्रास कमी होतो.

ओवा

ओवा हे गॅससाठी एक नैसर्गिक औषध आहे. जे पोट फुगण्याची समस्या कमी करते. ओव्यामधील गुणधर्म, पचन सुधारतात. आणि गॅसची समस्या कमी करतात. आपण आहारात ओव्याचा समावेश करू शकता.

आलं

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात. पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर, आपण आल्याचा चहा किंवा पदार्थात आलं घालू शकता.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

चहा किंवा कॉफी

गरम पेये पचन सुधारण्यास मदत करतात. पोट फुग्ण्याचा त्रास जाणवू लागल्यास आपण गरम चहा पिऊ शकता. त्यात आलंही घालू शकता. यामुळे गॅसची समस्या कमी होईल.

Web Title: 4 home remedies for an upset stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.