Join us   

4 Home Remedies for the Cold And Flu : पावसाळ्यात सर्दी, खोकला, घसादुखी लांब ठेवतील ४ पदार्थ; डॉक्टरांनी सांगितले खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 3:44 PM

4 Home Remedies for the Cold And Flu : या काढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पिण्याव्यतिरिक्त, आपण त्याचा वापर गार्गलिंग आणि स्टीम इनहेलिंगसाठी देखील करू शकता.

काढा ही एक आयुर्वेदिक रेसिपी आहे जी जुन्या काळापासून चालत आलेली आहे. कोरोना संसर्गामुळे सर्दी, खोकला झाला तरी लोकांच्या मनात भितीचं वातावरण तयार होतंय. पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्दी, खोकला, घसादुखीसारखे आजार वाढत जातात. (4 Home Remedies for the Cold And Flu) हवामानातील बदल, प्रवासात किंवा जास्त कोल्ड्रिंक्स आणि आइस्क्रीमच्या सेवनामुळे ही समस्या उद्भवणे सामान्य आहे. घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही गुणकारी काढा तयार करू शकता.  (Ayurveda experts dixa bhavsar share these 4 ingredients to prevent throat pain nasal congestion problem)

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी अशाच एक काढ्याची रेसिपी शेअर केली आहे. पुदिना, मेथी, ओवा आणि हळद यांच्यापासून तयार केलेला काढा खूप प्रभावी असल्याचे त्या सांगतात. हे सर्दी आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये झटपट आराम देण्याचे काम करते. या काढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पिण्याव्यतिरिक्त, आपण त्याचा वापर गार्गलिंग आणि स्टीम इनहेलिंगसाठी देखील करू शकता.

काढा बनवण्याची पद्धत

२  ग्लास पाणी, मूठभर पुदिना

१ टीस्पून ओवा

१ टीस्पून मेथी

१ टीस्पून हळद

२ ग्लास पाणी घ्या. या पाण्यात मूठभर पुदिना, १ टीस्पून ओवा, १टीस्पून मेथी, १ टीस्पून हळद मिक्स करून मध्यम आचेवर ७-१० मिनिटे उकळा. नंतर गॅस बंद करा. हा काढा तुम्ही तीन प्रकारे वापरू शकता.  वाफ घेण्यासाठी, पिण्यासाठी किंवा गुळण्या करण्यासाठी तुम्ही काढा वापरू शकता.

आरोग्यदायी फायदे

१) ओव्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पोटाशी संबंधित आजारांमध्ये आराम देण्याबरोबरच, त्वचेच्या समस्या आणि हाडांच्या कमकुवतपणासह वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

२) हळदीत वात कफ दोष कमी करणारे गुणधर्म आहेत.  शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासोबतच हे मधुमेहामध्येही खूप फायदेशीर मानले जाते.

३) पुदिन्यात  कफ आणि वात दोष कमी करणारे गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत, मल-मूत्राच्या समस्यांसह शरीराच्या कमकुवतपणामध्ये देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

४) मेथीमध्ये नियासिन, पोटॅशियम, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. यात डायोजेनिन नावाचे संयुग असते, जे सेक्स हार्मोन्स वाढवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत, लैंगिक समस्या टाळण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. मेथी कोलेस्ट्रॉल,  डायबिटीस, वजन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्याचे काम करते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य