Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, छातीतला कफ होईल कमी

आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, छातीतला कफ होईल कमी

4 home remedies to curb cold and cough : हवामान बदलले की छातीत कफ जमा होऊ लागते? खर्च टाळा, घरीच करून पाहा ४ उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2023 11:45 AM2023-11-04T11:45:56+5:302023-11-04T11:50:01+5:30

4 home remedies to curb cold and cough : हवामान बदलले की छातीत कफ जमा होऊ लागते? खर्च टाळा, घरीच करून पाहा ४ उपाय..

4 home remedies to curb cold and cough | आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, छातीतला कफ होईल कमी

आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, छातीतला कफ होईल कमी

हिवाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरात सर्दी-खोकल्याचा रुग्ण सापडतो. आता हळू हळू सर्वत्र गुलाबी थंडी पाहायला मिळते. ज्यामुळे सर्दी, खोकला होणं सामान्य आहे. ज्यांची रोगप्रतीकारशक्ती मजबूत नाही, ते लगेच आजारी पडतात. मुख्य म्हणजे संपूर्ण हिवाळा त्यांचा सर्दी-खोकल्यात निघून जातो.

अनेकदा सर्दीमुळे छातीत कफ जमा होतो. त्यामुळे आवाजात घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अशा वेळी अनेकांना नीट जेवताही येत नाही. बरेच जण औषधांचा आधार घेतात. पण आपण घरगुती उपाय करूनही यातून सुटका मिळवू शकता. जर आपण देखील सर्दी-खोकला-कफपासून त्रस्त असाल तर, आरोग्यतज्ज्ञ नुपूर रोहतगी यांनी सांगितलेल्या ४ उपायांना फॉलो करून पाहा(4 home remedies to curb cold and cough).

स्टीम थेरपी

बरेच जण सर्दी-खोकला झाल्यानंतर स्टीम थेरपीचा आधार घेतात. कोरोना काळात बऱ्याच जणांनी स्टीम थेरपीचा आधार घेतला होता. स्टीम थेरपी घेताना आपण पाण्यात तुळस किंवा पुदिन्याची पाने घालून पाणी गरम करू शकता. यामुळे फुफ्फुसातील श्लेष्मा काढून टाकण्यास मदत होते. यामुळे घसा, नाक आणि फुफ्फुस पूर्णपणे स्वच्छ होतात.

४ ‘असे’ पदार्थ, जे सकाळी खाल्ले तर चांगले, पण रात्री खाल्ले तर तब्येत बिघडते, असं का?

हळद

हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे छातीत जमा झालेला कफ सहज निघून जातो. याशिवाय यामध्ये असलेले कर्क्युमिन नावाचे तत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडत नाही.

काळी मिरी-मध

काळी मिरी आणि मध एकत्र करून खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शिवाय फुफ्फुसात जमा झालेला कफही निघून जातो. आपल्याला यातून लवकर आराम हवं असेल तर, दिवसातून २ ते ३ वेळा हे मिश्रण खा.

रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमजोर होतात? हे संकट टाळायचं तर खा ४ पदार्थ, रक्तप्रवाह राहील सुरळीत

आलं

आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. आले हे एक नैसर्गिक डिकंजेस्टेंट आहे जे घशाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघून जातो.

Web Title: 4 home remedies to curb cold and cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.