ड्रायफ्रुट्स (DryFruits) म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात ते काजू, बदाम, पिस्ता यासह इतर ड्रायफ्रुट्स. नियमित सुकामेवा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण खजूर देखील तितकेच फायदेशीर ठरते. खजूरमधील पौष्टीक घटकांमुळे खजुराला 'वडंर फूड' असं म्हटलं जातं.
निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. याच्या नियमित सेवनामुळे ब्रेन हेल्थ, पचनसंस्था, वेट लॉस, यासह मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते (Health Benefits). पण खजूर नेमके कधी खावे? नियमित खजूर खाण्याचे फायदे जास्त की तोटे? पाहूयात(4 Proven Health Benefits of Dates).
खजूरमधील पौष्टीक घटक
खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. जे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय त्यात बॅड कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारे गुणधर्म आढळतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
दुपारच्या जेवणात न चुकता खा डाळभात, वजन होईल कमी; हाडं होतील बळकट-तज्ज्ञ सांगतात..
स्मरणशक्ती वाढते
मेंदूसाठी खजूर खूप फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. याशिवाय कार्यक्षमताही वाढते. खजुरामध्ये व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पचनसंस्था सुधारते
फायबरयुक्त खजूर खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या इतर पाचक आरोग्य समस्यांपासून आराम मिळतो. फायबर आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर आपल्या पचनक्रियेत वारंवार अडथळे येत असतील तर, नियमित खजूर खा.
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर
खजूरमधील गुणधर्म मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. नियमित खजूर खाल्ल्याने इन्शुलीनचे उत्पादन वाढते आणि आतड्यांमधून ग्लुकोजचे शोषण दर कमी करते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
भूक लागल्यावर करिना कपूर खाते केळीचे कुरकुरीत चिप्स? पण याने वजन वाढते की कमी होते? तज्ज्ञ सांगतात..
अँटिऑक्सिडंटने समृद्ध
खजूरमध्ये कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फेनोलिक ॲसिड्स सारख्या अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कॅरोटीनोइड्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. शिवाय फ्लेव्होनॉइड्समधील दाहक विरोधी गुणधर्म महुमेहासह गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.
हाडं होतात मजबूत
खजुरमध्ये मॅंगनीज, तांबे, सेलेनिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे पोषक घटक आढळतात. जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.