आपणास सर्वांना दूध आणि मधाचे फायदे माहितच असेल. दुधात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय मधात कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, खनिजे, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर, सेलेनिअम, जीवनसत्त्व इत्यादी पोषक तत्त्वांचा समावेश असतो. त्यामुळे दूध आणि मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
आपण मध आणि दुधाचे सेवन वेगवेगळे न करता, एकत्र देखील करू शकता. दुधात मध मिसळून प्यायल्याने पोषक तत्वांमध्ये लक्षणीय वाढ होते. मात्र, दुधात मध मिसळून प्यायल्याने काय फायदा होतो? दुधात मध मिसळून कधी प्यावे?(4 Reasons Drink Warm Milk with Honey This Winter Season).
रात्री दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे
वेट गेनसाठी मदत
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, जर आपले शरीर सडपातळ असेल, व काही केल्या वजन वाढत नसेल तर, दुधात मध मिसळून प्या. दूध आणि मधामध्ये कॅलरीज, कार्ब्स आणि हेल्दी फॅट्स असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर आपण रोज रात्री दुधात मध मिसळून पीत असाल तर, काही महिन्यात आपल्याला फरक दिसेल. जर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर, याचे सेवन कमी प्रमाणात करा.
विषारी दुधी भोपळा ठरू शकतो जीवघेणा, चवीला लागत असेल कडू तर, आत्ताच फेकून द्या कारण..
पचन सुधारते
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आपण रोज रात्री दुधात मध मिसळून पिऊ शकता. दुधात मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे आतडे स्वच्छ होतात. तसेच गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. रोज रात्री दुधात मध मिसळून प्यायल्याने सकाळी पोट आरामात साफ होते.
ऊर्जा प्रदान करते
जर आपल्याला सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर, रोज रात्री दुधात मध मिसळून प्या. दररोज दुधात मध मिक्स करून प्यायल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची पुरेशी उर्जा मिळेल. रोज रात्री दुधात मध मिसळून प्यायल्यास दिवसभराचा थकवा दूर होतो.
हिरोईनसारखी किलर ३४-२४-३६ फिगर हवी? मग घरीच करा ५ सोपे व्यायाम, व्हा फिट आणि सुंदरही
रोगप्रतिकारकशक्ती करते मजबूत
दूध आणि मधात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याची क्षमता आहे. रोज दुधात मध मिसळून प्यायल्याने सर्दी, खोकला इत्यादी आजार टाळता येतील. मध विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
दुधात मध मिसळून कसे प्यावे?
दुधात मध मिसळून पिण्याची पद्धत सोपी आहे. यासाठी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध घालून मिक्स करा. आपण रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिऊ शकता. यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.