Join us   

भरपूर झोप झाली तरी सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही? ४ कारणं, म्हणून उडत नाही डोळ्यावरची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 12:22 PM

4 reasons you don’t feel fresh in the morning after your sleep : पुरेशी झोप न झाल्यास आपल्या शरीराचे एकूण कार्य बिघडते

रात्रीची चांगली ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. ही झोप झाली नाही तर आपला पुढचा पूर्ण दिवस अस्वस्थ जातो. मेंदूचे कार्य सुरळीत चालायचे असेल आणि मेंदूची रचना या दोन्हीवर झोपेचा परीणाम होत असतो. याशिवाय काम आणि सोशल मीडिया यासाठी आपण स्क्रीनचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, त्याचाही मेंदूवर एकप्रकारे ताण येत असतो. आपली पुरेशी झोप झाली तरीही अनेकदा आपल्याला सकाळी उठल्यावर अजिबात फ्रेश वाटत नाही. काहीच करायची इच्छा न होणे, आळस येणे, लोळत राहावेसे वाटणे असे कधीतरी होणे ठिक आहे. पण नेहमीच असे होत असेल तर मात्र यामागे काही नेमकी कारणे असण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यायला हवे (4 reasons you don’t feel fresh in the morning after your sleep).  

योग्य वेळी पुरेशी झोप न झाल्यास आपल्या शरीराचे एकूण कार्य बिघडते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा ताण येतो आणि झोप न होणे हे मुख्य कारण असू शकते. वेळेत झोपणे, झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे. विशेषत: महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन बिघडत असल्याने त्यांचे झोपेचे गणित बिघडण्याची शक्यता असते. मात्र तसे होऊ नये म्हणून काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पाहूयात सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटण्याची कारणे कोणती आणि त्यासाठी काय करायला हवे.  

(Image : Google)

 

१. दुपारी २ वाजल्यानंतर चहा किंवा कॉफी यांसारखी पेय घेतल्याने झोपेचे गणित बिघडण्याची शक्यता असते. या पेयांमध्ये असणारे कॅफीन मोलाटोनिन या हार्मोनवर परीणाम करते आणि त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. 

२. रात्री खूप उशीरा आणि हेवी जेवण घेणे हे झोप बिघडण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असते. आपण झोपलेले असताना पचनक्रियेचे काम शरीरात सुरू असेल तर शरीर गाढ झोपेत जाऊ शकत नाही. 

 

३. तुम्ही रात्री खूप उशीरा झोपत असाल आणि सकाळी लवकर उठत असाल तर तर तुम्हाला मुळातच कमी झोप मिळते. त्यामुळे सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटता थकल्यासारखे किंवा आळसावल्यासारखे वाटते. 

४. रात्री १२ किंवा त्यानंतर झोपणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. हल्ली अनेक जणांची कामे ही परदेशातील वेळांनुसार सुरू असतात. त्यामुळे ऑफीसच्या वेळा रात्री उशीरापर्यंत असतात. मात्र रात्री १० पर्यंत झोपणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले असते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल