एवढीशी वेलची खूप गुणकारी. विविध पदार्थात वेलचीचा वापर होतोच. पदार्थात वेलची घालताच चव तर वाढतेच, शिवाय पदार्थाला विशिष्ट सुगंधही येते. वेलचीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-६, प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
वेलची आपण अनेक प्रकारे खाऊ शकतो. पण वेलची कोणत्या वेळी खाल्ल्यास याचा फायदा शरीराला जास्त होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? रात्री जेवणानंतर वेलची खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? पाहूयात(4 Secrets Benefits of Eating Cardamom after Dinner).
निरोगी पचन
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, अयोग्य आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनकेदा पचनक्रियेत अडथळे येतात. मुख्य म्हणजे वेळेवर जेवण न केल्यामुळे पचनाचा त्रास होतो. मात्र, जेवणानंतर वेलची खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासह प्रवास करताना वेलची खाल्ल्यास उलटी, अपचनाचा त्रास होत नाही.
जेवल्यानंतर आंघोळ करता? थांबा, आयुर्वेद डॉक्टर सांगतात, पचन बिघडेल-वजनही वाढेल कारण
तोंडाची दुर्गंधी दूर करते
वेलचीमध्ये असलेले घटक श्वासाची दुर्गंधी दूर करतात. वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया वाढत नाही. यासाठी जेवणानंतर रोज एक वेलची खा.
घसा खवखवण्यापासून आराम
अनेक वेळा हवामानातील बदलांमुळे घसा खवखवतो. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी छोटी वेलची चघळून कोमट पाणी प्या, यामुळे घशातील खवखव दूर होईल.
सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर
झोप न येण्याची समस्या होईल कमी
अनेक वेळा शरीर थकूनही झोप वेळेवर लागत नाही. अपूर्ण झोपेमुळे आपली चिडचिड होते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. असे होऊ नये म्हणून जेवणानंतर वेलची खा, व नंतर कोमट पाणी प्या. नियमित असे केल्यास निद्रानाशाची समस्या सुटेल.