Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री घट्ट कपडे-अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याचे ४ दुष्परिणाम, डॉक्टर सांगतात-नाजूक जागांची दुखणी वाढतात कारण..

रात्री घट्ट कपडे-अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याचे ४ दुष्परिणाम, डॉक्टर सांगतात-नाजूक जागांची दुखणी वाढतात कारण..

रात्री अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याविषयीचे गैरसमज टाळा, आरोग्याचा विचार आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:35 PM2024-10-09T16:35:12+5:302024-10-09T16:43:15+5:30

रात्री अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याविषयीचे गैरसमज टाळा, आरोग्याचा विचार आवश्यक

4 side effects of sleeping in tight clothes-undergarments at night, doctors say-increases pain in sensitive areas because.. | रात्री घट्ट कपडे-अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याचे ४ दुष्परिणाम, डॉक्टर सांगतात-नाजूक जागांची दुखणी वाढतात कारण..

रात्री घट्ट कपडे-अंडरगारमेण्ट्स घालून झोपण्याचे ४ दुष्परिणाम, डॉक्टर सांगतात-नाजूक जागांची दुखणी वाढतात कारण..

रात्रीच्यावेळेस झोपताना काहीजण अंडरगारर्मेंट्स घालून झोपतात तर काहीजणांना हे कपडे अजिबात सहन होत नाहीत. रात्री अंडरगारमेंट्स घालणं आरोग्याच्यादृष्टीने घातक की सोयीचं याबाबत अनेक समज-गैरसमज दिसतात. मात्र त्याबाबत शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करायला हवा.  रात्री किती, कसे कपडे घालावेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी रात्री ब्रा घालून झोपण्याचे महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात.

कुठले आजार होतात याबाबत वैद्यकीय अभ्यास काही वेगळं सगळं. द ब्रेस्ट सेंटर, सी. के बिर्ला रुग्णालयाचे प्रमुख सल्लागार आणि विभाग प्रमुख डॉ. रोहन खंडेलवाल याविषयी माहिती देतात. त्यांच्या मते, रात्री अंडरगारमेंट्स घालून झोपणं आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक ठरु शकतं.

तज्ज्ञ सांगतात..

१. रात्री ब्रा घालून झोपू नये याबाबत महिलांचे अनेक गैरसमज आहेत. यातीलच एक गैरसमज म्हणजे ब्रा न घालून झोपल्यास स्तनांचा आकार बिघडतो किंवा स्तन ओघळतात. मात्र असा विचार करणं एकदम चुकीचं आहे. असे काहीही होत नाही. उलट संशोधनातून हे सिद्ध होते की अतिशय घट्ट ब्रा घातली तर मान आणि कंबरेदुखीही होऊ शकते.

२. पुरूषांसाठीही अंडरविअर घालून झोपणं नुकसानकारक ठरतं. मुलांचे अंडरविअर्स खूपच घट्ट असतात. अशा स्थितीत मांड्यांमध्ये घाम येऊ लागतो. हा घाम अनेक समस्यांचे कारण ठरतो. खाज, जळजळ या समस्या उद्भवतात. याशिवाय फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरिअल इन्फेक्शन आणि यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

३. पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर याचा चुकीचा परिणाम होतो. रात्री घट्ट अंडरगारमेंटस घातल्यानं खाज येते. स्पर्म क्वालिटी खराब होते आणि त्याचा परिणाम फर्टिलिटीवर होऊ शकतो. सेक्शुअल हेल्थ संबंधित समस्या उद्भवतात.  

४. डॉ. अनिता गौतमही रात्री अंडरगारमेंट्स न घालता झोपण्याचा सल्ला देतात.  अंडरगारमेंट्स खूपच घट्ट असतात. घट्ट कपडे घातल्यानं झोपेत बाधा येऊ शकते. ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही. जपानच्या नारा वूमन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार घट्ट ब्रा आणि घट्ट कपड्यांचा झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. घट्ट कपडे शरीराचे तापमान वाढवतात आणि मेलाटोनिन हॉर्मोन कमी होते. मेलाटोनिनच्या कमतरतेमुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

Web Title: 4 side effects of sleeping in tight clothes-undergarments at night, doctors say-increases pain in sensitive areas because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.