Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ४ गोष्टींवरुन समजते, तुम्हाला आणखी झोपेची गरज आहे का? झोप कमी होत असेल तर..

४ गोष्टींवरुन समजते, तुम्हाला आणखी झोपेची गरज आहे का? झोप कमी होत असेल तर..

4 signs that indicate you need more sleep : आपल्याला झोपेची गरज आहे हे कसे ओळखायचे? कोणत्या गोष्टी आपल्याला झोप आली आहे हे सूचित करतात ते पाहूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 04:14 PM2022-07-11T16:14:23+5:302022-07-11T16:32:03+5:30

4 signs that indicate you need more sleep : आपल्याला झोपेची गरज आहे हे कसे ओळखायचे? कोणत्या गोष्टी आपल्याला झोप आली आहे हे सूचित करतात ते पाहूया

4 signs that indicate you need more sleep : Understand 4 things, do you need more sleep? If sleep is declining .. | ४ गोष्टींवरुन समजते, तुम्हाला आणखी झोपेची गरज आहे का? झोप कमी होत असेल तर..

४ गोष्टींवरुन समजते, तुम्हाला आणखी झोपेची गरज आहे का? झोप कमी होत असेल तर..

Highlightsलक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आपली झोप जास्तीत जास्त वेळ आणि गाढ होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपले शरीर आपल्याला काही ना काही संकेत देत असते, त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

आपली शरीर आपल्याला वेळोवेळी काही ना काही संकेत देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र आपले शरीर कधी थकले, त्याला किती आरामाची आवश्यकता आहे? त्याला व्यायामाची गरज आहे का? कोणता आणि किती प्रमाणात आहार घेतला तर तब्येत चांगली राहील हे आपल्याला कळत असूनही आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही (Lifestyle Problems). मात्र त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याचीच शक्यता जास्त असते. अनेकदा आपल्याला झोप आलेली असतानाही कामाचा ताण किंवा सोशल मीडियाचे व्यसन यांमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण एखादवेळी नेहमीपेक्षा जास्त झोप आली असेल तरी हरकत नाही (Symptoms of less sleep). त्यावेळी शरीराला जास्तीच्या आरामाची आवश्यकता असू शकते. आता आपल्याला झोपेची गरज आहे हे कसे ओळखायचे? कोणत्या गोष्टी आपल्याला झोप आली आहे हे सूचित करतात ते पाहूया (4 signs that indicate you need more sleep)...

(Image : Google)
(Image : Google)

१. एकाग्रता न होणे 

अभ्यास करताना किंवा अगदी ऑफीसमधले, घरातले काम करताना आपल्याला एकाग्रतेची आवश्यकता असते. पण आपले एखाद्या गोष्टीत पुरेसे लक्ष लागत नसेल तर आपली झोप पूण झाली नाही किंवा आपल्याला आणखी झोपेची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. झोप पूर्ण झाली नसेल तर आपले लक्ष ताळ्यावर नसते आणि आपण कोणत्याच कामात मन एकाग्र करु शकत नाही. 

४ प्रकारची पानं करतात शुगर कण्ट्रोल; रोजच्या वापरात ‘ती’ पानं कशी वापरायची, ४ टिप्स

२. सतत काहीतरी खाणे 

काही लोकांना दिवसातील कोणत्याही वेळेला समोर दिसेल ते किंवा काहीही खाण्याची सवय असते. तुमचे तोंड दिवसातील कोणत्याही वेळेला सतत हलत असेल किंवा तुम्हाला सतत जंक फूड खाण्याची इच्छा होत असेल तर तुमची पुरेशी झोप होत नाही हे तुम्ही वेळीच ओळखायला हवे. त्यानुसार झोपेची वेळ वाढवायला हवी. झोप पूर्ण झाली की मन स्थिर राहते आणि तुम्हाला असे सतत काहीतरी खावेसे वाटत नाही. 

३. सतत तहान लागणे 

तुमचे तोंड सतत कोरडे पडत असेल किंवा तुम्हाला सारखी पाणी प्यायची इच्छा होत असेल तर तुमची झोप अपुरी झाली असण्याचे हे एक लक्षण असू शकते. त्यामुळे आपल्या दिनचर्येकडे लक्ष दिल्यास शरीर आपल्याला झोप पूर्ण न झाल्याचे संकेत देत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. यावरुन आपल्याला आता घेत असलेल्या झोपेपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असून ती झोप तुम्ही घ्यायला हवी. 

(Image : Google)
(Image : Google)

४. अल्कोहोल किंवा कॉफी

अनेकदा आपली झोप पूर्ण झाली नसेल तर आपले डोके फारसे नीट काम करत नाही. पण समोर असलेले काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. अशावेळी आपण चहा किंवा क़ॉफी घेतो. तुम्हालाही दिवसभरातून सतत चहा किंवा कॉफी घ्यायची इच्छा होत असेल आणि ती मिळाली नाही तर अस्वस्थ व्हायला होत असेल तर आपली झोप पुरेशी झाली नाही हे ओळखायला हवे. इतकेच नाही तर रात्री झोपताना अल्कोहोल घेतल्याशिवाय झोप न येणे हेही अपुऱ्या झोपेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आपली झोप जास्तीत जास्त वेळ आणि गाढ होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
 

Web Title: 4 signs that indicate you need more sleep : Understand 4 things, do you need more sleep? If sleep is declining ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.