Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता जास्त असते हे खरं की खोटं? ४ गंभीर लक्षणं, स्वत:कडे लक्ष द्या..

उन्हाळ्यात हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता जास्त असते हे खरं की खोटं? ४ गंभीर लक्षणं, स्वत:कडे लक्ष द्या..

4 Silent Heart Attack Symptoms in Summer : उन्हाळ्यात इतर अवयवांप्रमाणे हृदयाच्या कार्यावरही ताण निर्माण होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2023 05:02 PM2023-06-19T17:02:39+5:302023-06-19T17:26:38+5:30

4 Silent Heart Attack Symptoms in Summer : उन्हाळ्यात इतर अवयवांप्रमाणे हृदयाच्या कार्यावरही ताण निर्माण होतो

4 Silent Heart Attack Symptoms in Summer : Chances of heart attack are high in summer, 4 serious symptoms of heart attack problem | उन्हाळ्यात हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता जास्त असते हे खरं की खोटं? ४ गंभीर लक्षणं, स्वत:कडे लक्ष द्या..

उन्हाळ्यात हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता जास्त असते हे खरं की खोटं? ४ गंभीर लक्षणं, स्वत:कडे लक्ष द्या..

हार्ट ॲटॅक म्हणजे पूर्वी काहीतरी गंभीर समस्या वाटायची. मात्र आता अगदी तरुण वयातील व्यक्तींना, व्यायाम करणाऱ्यांनाही हार्ट ॲटॅक येत असल्याने इतर आजारांप्रमाणे ही समस्या काहीशी सामान्य झाली आहे. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक. हृदयाचं कार्य सुरळीत असेल तरच शरीर सुरू असतं. पण या कामात काही अडथळा आला तर मात्र आपलं जीवन थांबण्याची शक्यता असते. या हृदयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात असणे आवश्यक असते. इतकेच नाही तर आपला रक्तदाब आणि इतर गोष्टीही व्यवस्थित असतील तर हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. वाढते ताणतणाव, स्पर्धा, आहाराच्या चुकीच्या पद्धती, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यांमुळे आरोग्याच्या सर्वच समस्यांमध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण काहीसे जास्त असण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात इतर अवयवांप्रमाणे हृदयाच्या कार्यावरही ताण निर्माण होतो, जास्त काम करावे लागल्याने त्याला प्रेशर येते आणि कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमवर ताण पडून हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता असते (4 Silent Heart Attack Symptoms in Summer). 

(Image : Google)
(Image : Google)

हृदयविकाराचा झटका म्हणजे काय ? 

हृदयाला रक्तुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने ब्लॉकेजेस झाले तर हा रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हृदयाच्या कामात अडथळा निर्माण होतो. ही समस्या साधारणपणे लक्षात येत नसल्याने वयाच्या तिशीनंतर दर एक ते दोन वर्षांनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपल्याला काही त्रास असल्यास तो वेळीच लक्षात येतो आणि उपचार करणे सोपे होते. रक्ताच्या माध्यमातून हृदयाला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही तर ही समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा, बीपी, मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या असतील तर वेळच्यावेळी तपासण्या आणि औषधोपचार करणे गरजेचे आहे.  हार्ट ॲटॅक अत्यंत तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा असतो, पहिल्या तासात रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि गंभीर असते. यावेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.  

हार्ट टॅकची लक्षणं

१. धाप लागणे 

हार्ट ॲटॅक येतो तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मात्र सायलेंट हार्ट ॲटॅकमध्ये ही समस्या अगदी कमी प्रमाणात जाणवते. त्यामुळे धाप लागल्यासारखे किंवा श्वास घ्यायला त्रास होत असल्यासारखे वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवे. 

२. छातीत जडपणा

हार्ट ॲटॅक हा बरेचदा कोणत्याही लक्षणाविना येतो, त्यामुळे तो गंभीर असतो. त्यामुळेच तुम्हाला छातीत जड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. हे हार्ट ॲटॅकचे महत्त्वाचे कारण असू शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. इतर अवयवांमध्ये दुखणे

हार्ट ॲटॅकच्या दरम्यान हृदयातून होणारा रक्तप्रवाह इतर अवयवांत जाताने हे दुखणे घेऊन जाऊ शकतो. पोट, छाती, हात, कंबर दुखणे हेही हार्ट ॲटॅक येण्याचे लक्षण आहे. त्यामुळे त्याकडे एका मर्यादेपेक्षा जास्त दुर्लक्ष करणे योग्य नाही. 

४. घाम येणे 

हृदयावर ताण येणे आणि त्यामुळे घाम फुटणे हे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. अशावेळी घाम येण्याबरोबरच मळमळणे, उलटीसारखे वाटणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.   

 

Web Title: 4 Silent Heart Attack Symptoms in Summer : Chances of heart attack are high in summer, 4 serious symptoms of heart attack problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.