सध्याच्या नवीन पिढीला, ''मुझे निंद ना आये, मुझे चैन ना आये'' म्हणण्याची वेळ आली आहे. असे अनेक लोकं आहेत, ज्यांची रात्रीची झोप उडालेली आहे. ही झोप प्रेमामुळे नाही तर, खराब जीवनशैलीमुळे उडाली आहे. काही लोकांना रात्रीची झोप कमी व दिवसा झोप लागते. असे का होते? या प्रश्नाचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
शरीराला निदान ८ तासांची झोप गरजेची आहे. पण काही लोकं रात्रीची झोप कमी घेत, मोबाईल फोनमध्ये व्यस्त असतात. किंवा झोप येण्यासाठी वारंवार जागा बदलून पाहतात. ज्यामुळे अपुरी झोप होते. अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण दिवस कंटाळवाण्यात जातो, यासह इतर आजार शरीराला छळतात. असे होऊ नये, असे वाटत असेल तर काही टिप्स फॉलो करा. जेणेकरून रात्रीच्या वेळी डोळे मिटताच झोप येईल, व सकाळी फ्रेश वाटेल(4 Simple Tips That Help You Fall Asleep Quickly).
झोपेच्या आधी हे काम करून पाहा
झोपेमुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते. यामुळे रात्रीच्या वेळी खोली थोडीशी थंड करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान कमी होईल आणि मेंदूला झोपेचा सिग्नल मिळेल.
उन्हाळ्यात शुगर जास्त आणि लवकर वाढते? हे खरं की खोटं, तज्ज्ञ सांगतात
कोमट पाण्याने अंघोळ करा
झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने शरीराचे तापमान काही काळासाठी वाढेल. पण शरीराचे तापमान पडल्यावर मेंदूला झोपेचा सिग्नल मिळतो. ज्यामुळे लगेच झोप लागते.
योग निद्रामुळे काही मिनिटात झोप येईल
दिवसभराच्या कामामुळे जर आपणास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा येत असेल तर, स्वत: ला आराम देण्यासाठी योग निद्रा हा एक उत्तम पर्याय करून पाहा. या योगाच्या मदतीने आपल्याला काही मिनिटांतच झोप येईल. आपण ही योग निद्रा बेडवर करू शकता.
चमचाभर ओवा आणि ग्लासभर पाणी, अपचनापासून पोटावर वाढलेल्या चरबीपर्यंत सगळ्यांवर गुणकारी उपाय
हे लक्षात ठेवा
लवकर झोप येण्य्साठी मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्स बेडपासून दूर ठेवा. ते तुमचे लक्ष विचलित करतात, ज्यामुळे लवकर झोप येत नाही. तसेच, बेडवर झोपताच तुमच्या खोलीतील दिवे बंद करा.