Join us   

रात्री मोबाइल उशाशी घेऊन झोपण्याचे ४ भयंकर दुष्परिणाम, स्ट्रेस वाढला आहे तुमचा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2023 1:14 PM

Side effects of sleeping with the phone under pillow बऱ्याच जणांना रात्रीच्या वेळी उश्याखाली मोबाईल फोन घेऊन झोपण्याची सवय असते. मात्र, ही सवय ठरू शकते हानिकारक

मोबाईल फोन हे एक असं उपकरण बनलं आहे, ज्याच्या वाचून आपला दिवस पूर्ण होत नाही. मोबाईल फोन माणसांवर इतका हावी झाला आहे, की आपली प्रत्येक गोष्ट त्याच्या आत दडली गेली आहे. सोशल मीडिया माध्यम असो अथवा इतर कामे मोबाईल फोन शिवाय कित्येकांचे पान हालत नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच मोबाईल नावाच्या व्यसनाने ग्रासलं आहे. मोबाईल वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेसुद्धा आहेत.

बहुतांश लोकं सकाळी उठल्यावर देखील मोबाईलचे नोटिफिकेशन पाहून उठतात. रात्री झोपताना देखील काही लोकं मोबाईल डोक्याजवळ ठेवून झोपतात. मात्र, झोपताना मोबाईल उश्याजवळ ठेवून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

मध्यरात्री अचानक जाग येणे

बरेच जण रात्रीच्या वेळी मोबाईल फोनवर टाईमपास करून झाल्यानंतर डोक्याच्या जवळ फोन ठेवून झोपतात. मात्र, असे केल्याने डोळ्यांवर दुष्परिणाम होतो. जे लोकं रात्रभर मोबाईल फोन पाहतात, त्यांना मध्यरात्री जाग येण्याची शक्यता असते. फोनमधून येणाऱ्या हानिकारक लहरींचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो, यामुळे अल्झामरसारखे विकार होऊ शकतात.

यूएस नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्राम (NTP) ने यासंदर्भात नुकतंच एका अभ्यासाचे प्रकाशन केलं आहे. त्यांनी दोन उंदरांना घेऊन याचा अभ्यास केला. नर उंदरांमध्ये हृदयाच्या असामान्य ट्यूमरचा धोका वाढलेला आढळला, परंतु मादी उंदरांमध्ये नाही. NTP अभ्यासाने यासह मेंदूतील विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरच्या वाढीव जोखमीचीही नोंद केली आहे.

शरीरावर होणारे दुष्परिणाम

मोबाईल फोनमधून सतत रेडिओ फ्रिक्वेंसी निघत असतात. ज्याचा मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो. काही संशोधनात असे आढळले की यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.

रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे तुम्हाला अनिद्रा आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात.

मोबाईलच्या या लहरींमुळे माणसाच्या डिएनए स्ट्रक्चरवर परिणाम होत असल्याचं काही संशोधनात आढळून आलं आहे.

मोबाईल पाहत रात्री झोपल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य