Join us   

थंडीत बदाम खाताय? आरोग्यासाठी चांगलेच, पण लक्षात ठेवा ४ गोष्टी, नाहीतर उपयोग होण्याऐवजी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 1:47 PM

4 things to remember before having almonds in Winter : चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहाराचा आपल्याला त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते.

थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपण या काळात तूप, सुकामेवा, गूळ यांसारख्या पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करतो. यामध्ये बदामांचाही आवर्जून समावेश असतो. बदामातून प्रोटीन्स, ओमेगा ३ फॅटी अॅसिडस मिळत असल्याने आपण बदाम आवर्जून खातो. याशिवाय बदामात कॅल्शियम, आयर्न, झिंक, व्हिटामीन ई आणि शरीराला आवश्यक अशी बरीच खनिजे असतात. काही जण सकाळी उठल्या उठल्या, काही स्नॅक टाइममध्ये तर काही जण एखाद्या पदार्थामध्ये बदामाचा आवर्जून वापर करतात. बदामामुळे थंडीत शरीराला ताकद मिळण्यास मदत होते हे जरी खरे असले तरी बदाम खाण्याची योग्य वेळ, पद्धत आपल्याला माहित असायला हवी. नाहीतर चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या आहाराचा आपल्याला त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. पाहूयात बदाम खाण्याची योग्य वेळ, पद्धत कोणती (4 things to remember before having almonds in Winter)...

बदाम कसा खावा?

बदामाचा जास्त फायदा हवा असेल तर तो भिजवून खाल्लेला केव्हाही जास्त चांगला. भिजल्यामुळे बदाम पचायला हलका होतो. तसेच बदामाचे साल काढून मगच बदाम खायला हवा त्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि बदामातून जास्त प्रमाणात पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. 

(Image : Google)

योग्य वेळ कोणती? 

सकाळी नाश्ता करण्याच्या आधी बदाम खाल्ल्यास त्यातून शरीराला जास्त प्रमाणात पोषण मिळण्यास मदत होते, तसेच दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास त्याचा चांगला फायदा होतो. दिवसाला जास्तीत जास्त ५ बदाम खाणे ठिक आहे. त्यापेक्षा जास्त बदाम खाल्ल्यास पचनाशी निगडीत समस्या निर्माण होतात.  

कोणी बदाम खाऊ नयेत? 

ज्यांना सर्दी-खोकला आहे अशांनी बदाम खाणे टाळावे, कारण यामुळे कफ आणि सर्दी वाढण्याचीच शक्यता जास्त असते. तसेच ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी आहेत त्यांनीही शक्यतो बदाम खाऊ नयेत. 

बदामाचे फायदे

१. वात असंतुलन, मज्जातंतुच्या वेदना, अर्धांगवायू आणि इतर क्षीण विकारांसाठी बदाम सर्वोत्तम आहेत.

२. बदामामुळे शुक्राणूंची संख्या सुधारते आणि वीर्य गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण यावर चांगला परीणाम होण्यास मदत होते. 

३. रक्तस्त्राव विकार, मासिक पाळीत जड रक्तस्राव, नाकातून रक्तस्राव इत्यादींवर बदाम खाणे फायदेशीर ठरते.

४. स्मरणशक्तीसाठी बदाम फायदेशीर असल्याने लहान मुलांना आवर्जून बदाम दिले जातात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना