Join us   

चमचाभर मध आणि 'या' काळ्या बियांचा उपाय, वजनही होईल कमी आणि त्वचाही चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 5:50 PM

4 Ultimate Benefits of Eating Honey Dipped Kalonji Seeds : मधात 'या' काळ्या बिया घालून खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ४ जबरदस्त फायदे

उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार खाणं गरजेचं (Health Benefits). आहारात जर पौष्टीक पदार्थांचा समावेश नसेल तर, आरोग्य तर बिघडतेच, शिवाय गंभीर आजारांचाही धोका वाढतो (Honey). मुख्य म्हणजे लठ्ठपणामुळेही गंभीर आजार छळतात. ज्यामुळे केस आणि स्किनही खराब होते (Kalonji Seeds). यावर उपाय म्हणून आपण मध आणि कलौंजीचा सोपा उपाया करून पाहू शकता.

मध आणि कलौंजीच्या बिया एकत्र खाल्ल्याने त्यातील पौष्टीक घटक प्रतीकारशक्ती वाढवतात. यासह मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही दूर राहतो. मध आणि कलौंजीच्या बिया खाण्याचे फायदे किती? याची माहिती डायटीशियन शिवाली गुप्ता यांनी दिली आहे(4 Ultimate Benefits of Eating Honey Dipped Kalonji Seeds).

मध आणि कलौंजीच्या बिया खाण्याचे फायदे

कलौंजीच्या बियांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट एन्झाइम वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शिवाय या बियांमध्ये भूक भागवण्याची किंवा कमी करण्याची क्षमता देखील असते. हे खाल्ल्याने फॅट्स कमी होण्यास मदत होते.  मध खाल्ल्याने पोटाची चरबी जाळण्यास मदत होते. जर आपण लठ्ठ शरीरामुळे हैराण असाल, तर कलौंजी आणि मध खाऊ शकता.

वेट लॉस, केस मजबूत आणि त्वचा टवटवीत हवीय? मग 'हा' पांढरा लाडू रोज खा; हृदयविकारही राहील दूर

हृदयरोगाचा धोका कमी

कलौंजीच्या बिया हृदयाच्या अनेक समस्या दूर करतात. या बिया खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहते. कलौंजीच्या बिया बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. मध खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबर मधातील फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ॲसिड्स हृदयासाठी फायदेशीर असतात.

प्रतिकारशक्ती बुस्ट होते

थकवा दूर करण्यासाठी आपण कलौंजीच्या बिया खाऊ शकता. कलौंजीच्या बियांमध्ये असणारे जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि प्रथिने रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यासह शरीराला डिटॉक्सिफाय करतात. फक्त कलौंजीच्या बिया नसून आपण त्यासोबत मधाचेही सेवन करू शकता. मधामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे नैसर्गिक घटक असतात. ज्यामुळे ऋतू बदलांमुळे होणारे आजार दूर होतात.

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

निरोगी त्वचा

कलौंजी आणि मध खाल्ल्याने त्वचा टवटवीत राहते. मधामुळे त्वचेला अँटिऑक्सिडेंट मिळतात. याशिवाय, ते त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकते. कलौंजीच्या बियांमुळे चेहऱ्यावर मुरूम किंवा मुरुमांचे डाग राहत नाही. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स