सध्याच्या काळात लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, योग्य आहार न खाणे, प्रत्येक वेळेस उलट-सुलट खाणे, तळकट-मसालेदार पदार्थांमुळे पचन तर बिघडतेच, शिवाय वजन यासह इतर गंभीर आजार निर्माण होतात. ज्यामुळे आरोग्य बिघडते.
मुख्य म्हणजे बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे या त्रासामुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही, व खाल्लेलं अन्नही लवकर पचत नाही. पोटाचे विकार आपल्याला छळू नये, यासाठी खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, खाता-पिताना कोणती विशेष काळजी घायायला हवी, जेणेकरून पोटाचा त्रास होणार नाही, पाहूयात(4 Ways to Avoid Bloating After Eating).
अपचन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
पाणी पिणे
जेवण करण्याच्या ३० मिनिटाआधी नेहमी पाणी प्या. उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण अशा स्थितीत पचनासह शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित चालतात. आपण दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. शिवाय असे पदार्थ खा ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल.
दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी
आलं
आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजारही दूर होतात. आपण कच्चे आले चघळू शकता किंवा आल्याचा चहा, आले पाणी आणि आले कँडी खाऊ शकता.
दही
आपण दही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. दही हे एक प्रोबायोटिक फूड आहे. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. आपण दही जेवण करताना किंवा जेवणानंतरही खाऊ शकता.
शतपावली
जेवल्यानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्यानंतर शतपावली करा. निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि नंतर बद्धकोष्ठता किंवा गॅसेससारखा त्रास होत नाही.