Join us   

प्रवासात मळमळते-उलटीचा त्रास होतो? ४ सोपे उपाय, काही मिनिटात त्रास गायब, प्रवास होईल सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2023 10:40 AM

4 Ways To Prevent Travel Sickness : आपल्यालाही जर गाडी लागत असेल तर, हे खास ४ उपाय तुमच्यासाठी..

काही लोकांना प्रवास करायला प्रचंड आवडते. ट्रेन, बस किंवा ४ व्हीलरमधून एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास सोपे होते. मात्र, अनेकांना प्रवासात उलट्या होतात. ज्यामुळे प्रवास हा सुखकर होत नाही. या कारणामुळे अनेक जण प्रवास करायला टाळतात. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात.

मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या होतात. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. अशा वेळी कोणतेही उपाय फोल ठरतात. जर आपल्याला देखील मोशन सिकनेसचा त्रास असेल तर, काही उपाय फॉलो करून पाहा. यामुळे नक्कीच फरक पडेल(4 Ways To Prevent Travel Sickness).

उलटी रोखण्यासाठी काय करावे?

फॅमिली डॉक्टर वेबसाइटनुसार, मोशन सिकनेस टाळण्यासाठी, नेहमी ताजी हवा असलेल्या ट्रेन किंवा बसमध्ये खिडकीजवळ बसा. यामुळे मळमळणार नाही.

नाश्त्याला इडली खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? त्यासाठी कधी आणि किती प्रमाणात इडली खावी?

वेलची

जर आपल्याला मळमळ किंवा उलटीचा त्रास होत असेल तर, वेलची खा. यामुळे उलटीची समस्या सहज दूर होईल. यासाठी वेलची अक्खी चावून खा.

लिंबू

लिंबू उलटीची टेंडेंसी कमी करते. त्यात आढळणारे व्हिटॅमिन सी ही समस्या टाळण्यास मदत करते. जर आपल्याला उलटी किंवा मळमळचा त्रास होत असेल तर, एक ग्लास लिंबू सरबत प्या.

बडीशेप

बडीशेप फक्त माऊथफ्रेशनर म्हणून काम करत नाही तर, उलट्या रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे. यामुळे उलट्या होत नाही.

फिट कसं रहायचं हेच कुणी शिकवलं नाही? श्री.श्री. रविशंकर सांगतात उत्तम तब्येतीसाठी करायचं काय?

लवंग

उलटी किंवा मळमळ थांबवायची असेल तर, लवंग खा. लवंग तोंडात ठेवल्याने उलटी थांबते. आपण पाण्यात लवंग उकळवून देखील पिऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य