Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

4 Wonderful Benefits Of Eating Kidney Beans : कडधान्य खाल्ल्यानंतर गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून पाहा उसळ करायची कशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2024 10:00 AM2024-08-09T10:00:01+5:302024-08-09T10:05:02+5:30

4 Wonderful Benefits Of Eating Kidney Beans : कडधान्य खाल्ल्यानंतर गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून पाहा उसळ करायची कशी

4 Wonderful Benefits Of Eating Kidney Beans | वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..

शरीर मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत (Health Benefits). पोषक तत्वांनी परिपूर्ण अन्न शरीराला तंदुरुस्त ठेवते (Rajma). पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खाण्याकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. हेल्थची काळजी घेताना आपण कडधान्य आवर्जून खातो. ज्यात राजमाचा देखील समावेश आहे. राजमा खाण्याचे अनेक फायदे आहेत. राजमामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर 'या' पद्धतीने राजमा खा. फरक दिसेल.

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, '१०० ग्रॅम उकडलेल्या राजमामध्ये सुमारे ९ ग्रॅम प्रोटीन, ६.५ ग्रॅम फायबर, २२ ग्रॅम कार्ब्स असतात. याशिवाय यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते. राजमाचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी राजमा फायदेशीर ठरू शकते'(4 Wonderful Benefits Of Eating Kidney Beans).

फक्त ब्रशने घासून दात मजबूत होत नाहीत; यासाठी ४ पैकी १ गोष्ट रोज खा; दुधासारखी बत्तीशी दिसेल शुभ्र

राजमा खाण्याचे फायदे

- राजमामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. जे स्नायूंच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. किडनी बीन्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखीच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे.

- किडनी बीन्समध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. राजमा बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्यांपासून आराम देते. मुख्य म्हणजे यातील प्रोटीन आणि फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

- किडनी बीन्समध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी आवश्यक खनिजे असतात. लोह शरीरात रक्त निर्मितीसाठी मदत करते, तर कॅल्शियम हाडे मजबूत करते.

समंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्याच्या आयुष्यात एन्ट्री घेणारी शोभिता नक्की कोण?

- किडनी बीन्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे फायबर आणि पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

कशापद्धतीने राजमा खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो?

- राजमा शिजवण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यामुळे त्यातील पोषक तत्वे कमी होणार नाही. शिवाय गॅसची समस्या कमी होऊ शकते. 

Web Title: 4 Wonderful Benefits Of Eating Kidney Beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.