कडधान्ये आहारात असावे असा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळाला असेल. कडधान्यांमध्ये अनेक प्रकार असतात. त्यात जास्त मूग डाळीचा वापर आपल्या पदार्थांमध्ये होतो. मूग डाळीचा वापर खिचडी, डोसा, दलिया, भजी, हलवा हे पदार्थ करण्यासाठी होतो. मूग डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी-6, नियासिन, थायामिन आणि फोलेट आढळते. यात फायबर असल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचते. मूग डाळ खाण्याचे फायदे किती आहेत हे पाहूयात.
यासंदर्भात, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांगतात, ''आयुर्वेदानुसार आहारात मूग डाळ असायला हवी. मूग डाळ सुपरफूड म्हणून मानली जाते. पचनाच्या बाबतीत इतर कडधन्यांपेक्षा ही लवकर पचते. कफ आणि पित्त संतुलित करण्यासाठी या डाळीचा आहारात समावेश केला जातो. यासह त्यात फायबर व प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते''(5 Amazing Moong Dal Benefits That Will Make You Eat It Everyday!).
मुग डाळ खाण्याचे फायदे
१. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी मुगाच्या डाळीचे पदार्थ खा. मूग डाळ खाल्ल्याने पचनाशी संबंधित इतर समस्या, जसे बद्धकोष्ठता, पोटात गॅस याचा त्रास कमी होतो.
२. आपण जर वजन कमी करत असाल तर, आहारात मूग डाळीचा समावेश करा. मूग डाळीत कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही. यात पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, जे भूक नियंत्रित करते. मूग डाळ खाल्ल्याने आपल्याला वारंवार भूक लागत नाही.
सतत स्मार्ट फोन स्क्रोल करकरुन अंधूक दिसू लागले? ४ व्हिटॅमिन्सचा डोस वाढवा, नजर राहील शाबूत
३. मधुमेही रुग्णांना मूग डाळ खाण्याचा सल्ला मिळतो. मूग डाळीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते. जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मूग डाळीचा आहारात समावेश करा.
४. जर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, आहारात मूग डाळीचा समावेश करा. मूग डाळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम पुरेसे प्रमाणात असते, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. आपण मूग डाळ नियमित देखील खाऊ शकता. परंतु, त्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय
५. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.