Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यांत घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम, थकवा, डिहायड्रेशन होणारच नाही - मिळेल इन्स्टंट एनर्जी...

उन्हाळ्यांत घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम, थकवा, डिहायड्रेशन होणारच नाही - मिळेल इन्स्टंट एनर्जी...

Add Pinch Of Salt Before Drinking Water Strengthen Nerves Muscles Function Increase Energy : 5 Benefits Of Adding A Pinch Of Salt To Your Water This Summer : Why are people adding salt to their water for hydration : पाण्याच्या बाटलीत मिसळा चिमूटभर मीठ ऊन्हामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या राहतील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 19:19 IST2025-03-19T19:06:30+5:302025-03-19T19:19:47+5:30

Add Pinch Of Salt Before Drinking Water Strengthen Nerves Muscles Function Increase Energy : 5 Benefits Of Adding A Pinch Of Salt To Your Water This Summer : Why are people adding salt to their water for hydration : पाण्याच्या बाटलीत मिसळा चिमूटभर मीठ ऊन्हामुळे होणाऱ्या शारीरिक समस्या राहतील दूर...

5 Benefits Of Adding A Pinch Of Salt To Your Water This Summer | उन्हाळ्यांत घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम, थकवा, डिहायड्रेशन होणारच नाही - मिळेल इन्स्टंट एनर्जी...

उन्हाळ्यांत घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम, थकवा, डिहायड्रेशन होणारच नाही - मिळेल इन्स्टंट एनर्जी...

सध्या दिवसेंदिवस उन्हाळा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे वातावरणातील उष्णता वाढत जात आहे. उन्हाळ्याच्या अशा दिवसांत घराबाहेर पडणे आपल्याला नकोसे वाटते. उन्हाच्या (5 Benefits Of Adding A Pinch Of Salt To Your Water This Summer) तडाख्याने जीवाची काहिली होते, वाढत्या उकाड्याने जीव नकोसा होतो. दिवसा पडलेले कडक ऊन पाहून ऑफिसला किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पाऊल ठेवणे नको वाटते. ऊन असल्यावर घराबाहेर पडताना आपण ऊनापासून बचाव करण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेतो (Add Pinch Of Salt Before Drinking Water Strengthen Nerves Muscles Function Increase Energy).

अनेकदा आपण ऊन लागू नये म्हणून काळजी घेतल तरी काहीवेळा आपल्याला या ऊनाचा त्रास होतोच. ऊन्हांत गेल्यावर आपल्या केसांपासून ते आरोग्यापर्यंत अनेक समस्या सतावतात. काहीवेळा आपल्याला ऊन लागल्यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, डिहायड्रेटेड होणे, थकवा जाणवणे, मळमळणे यांसारख्या अनेक सतावतात. अशावेळी, आपल्याला सगळ्यांत आधी पाणी प्यावेसे वाटते. परंतु अशा परिथितीत नुसते पाणी पिऊन भागत नाही तर शरीराला इन्स्टंट एनर्जीची देखील गरज असते. यासाठी घराबाहेर पडताना पाण्याच्या बाटलीत चिमूटभर मीठ टाकणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या बाटलीत चिमूटभर मीठ टाकण्याने नेमकं होत काय ते पाहूयात.    

पाण्याच्या बाटलीत चिमूटभर मीठ टाकण्याचे फायदे :- 

१. इलेक्ट्रोलाइट्स वाढवते :- सोडियम, पोटॅशियम आणि झिंक हे तीन घटक मिळून एकत्रितपणे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स तयार करतात. जेव्हा आपण पाण्यात चिमूटभर मीठ घालतो तेव्हा मीठातील सोडियम आणि पोटॅशियम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची संख्या वाढवतात. यामुळे आपली नर्व्ह सिस्टीम आणि स्नायूंना मजबूतपणा येण्यास अधिक मदत होते. 

वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...

शिल्पा शिरोडकरने 'हा' खास फॉर्म्युला वापरुन वयाच्या पन्नाशीत केलं वजन कमी, पाहा सिक्रेट...

२. नसा आणि स्नायूंमध्ये ताकद येते :- पाण्यात चिमूटभर मीठ घातल्याने नसांना पुरेसे सोडियम मिळते. ज्यामुळे नसा आणि स्नायूंची ताकद वाढते. पुरेशा सोडियममुळे, स्नायूंमध्ये पेटके येण्याची समस्या नाहीशी होते आणि नसा मजबूत होतात. 

३. पचनक्रियेचे कार्य सुरळीत करणे :- मिठात असलेले सोडियम आणि पोटॅशियम आपल्या शरीरातील पाचक एंजाइम वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे  अन्न जलद पचन होण्यास मदत होते. पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्याने खाल्लेल्या अन्नपदार्थांतील पोषक तत्वे देखील योग्यरित्या शोषली जातात. 

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...

४. विषारी पदार्थ बाहेर टाकतात :- पाण्यात मीठ घालून प्यायल्याने आपल्या संपूर्ण शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत होते. यामुळे तोंडापासून आतड्यांपर्यंत इतर अवयवांमध्ये असणारे सर्वच हानिकारक जीवाणू मरतात. यामुळे शरीर स्वच्छ होते. मीठ आणि पाणी एकूण आरोग्य सुधारते.

५. त्वचेला चमक येते :- मीठात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम फार मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे त्वचेवर चमक येते. यामुळे त्वचेला होणारे बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग देखील कमी होण्यास मदत मिळते. या उपायामुळे त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन देखील वाढते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढते.


Web Title: 5 Benefits Of Adding A Pinch Of Salt To Your Water This Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.