जर तुम्हाला जीमला जाण्यासाठी फारसा वेळ मिळत नसेल तर वजन कमी करणं घरीसुद्धा शक्य होऊ शकतं. ५ वेट लॉस व्यायाम घरीच करून तुम्ही मेंटेन फिगर मिळवू शकता. हे घरगुती व्यायाम इतके पॉवरफूल आहेत की पोटाची चरबी सहज कमी करतील. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला १० मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागेल. (Bellyfat Loss Tips) पोटाचे हे व्यायाम करण्यासाठी सुरूवातीला तुम्हाला फक्त १ मिनिट द्यावा लागेल. प्रत्येक व्यायामामध्ये ३० सेकंदाचा आराम घ्या नंतर पुढचा व्यायाम सुरू करा. हा व्यायाम नियमित केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. अतिरिक्त चरबी कमी होऊन पोट मेटेंन दिसेल. (5 Best Exercises to Lose Weight At Home)
लेग रेज
या व्यायामानं पोटाचे आणि पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हा व्यायाम करण्यासाठी सरळ उभे राहा त्यानंतर पाय वरच्या दिशेनं न्या आणि पुन्हा खाली आणा. १५ ते २० वेळा ३ रिपिटेशन्समध्ये हा व्यायाम करा. झोपूनही तुम्ही हा व्यायाम करू शकता.
जंपिंग जॅक
वजन कमी करण्यासाठी जंपिंग जॅक महत्वाचा व्यायाम आहे. हा व्यायाम संपूर्ण शरीरातील चरबी काढून टाकते. यासाठी सरळ उभे राहून दोन्ही हात पायांच्या बाजूला ठेवा. आता उडी मारा आणि पाय रुंद करून उभे राहा. या दरम्यान तुम्हाला दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन टाळी वाजवावी लागेल. यानंतर उडी मारून सुरुवातीच्या स्थितीत या. हा व्यायाम 1 मिनिट सतत करा.
हाय नी एक्सरसाईज
हा व्यायाम (High knee Exercise) देखील मांड्या आणि नितंबांची चरबी काढून टाकतो. सर्व प्रथम सरळ उभे रहा.आता कंबरेपर्यंत हात सारखे ठेवा आणि दोन्ही तळवे जमिनीकडे टेकवून उभे रहा. श्वास घ्या आणि उजवा गुडघा उजव्या तळहातापर्यंत वर करा. नंतर ते खाली घेऊन, डावा गुडघा डाव्या तळहाताला वर करा. अशा प्रकारे 1 मिनिट सतत त्याच ठिकाणी धावत राहा.
प्लॅक व्यायाम
पोटाचे स्नायू घट्ट करण्यासाठी प्लँक हा उत्तम व्यायम आहे. सर्व प्रथम, पोटावर जमिनीवर झोपा. आता दोन्ही तळवे आणि बोटांवर शरीराचे वजन आणा. तुमची मान, कंबर आणि नितंब एका सरळ रेषेत ठेवा. नंतर कोपर खांद्याच्या अगदी खाली जमिनीवर ठेवा आणि समोर पाहा.1 मिनिट असेच राहा आणि पोटाचे स्नायू घट्ट ठेवा.
रनिंग
धावण्याने वजन कमी होण्यासोबत स्टॅमिना वाढतो. हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. जे हात, पोट, मांडी, हिप फॅट काढून टाकण्याचा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे करू शकता आणि हळूहळू वेळ आणि वेग वाढवत राहा.