Join us   

किती लुकडीसुकडी आहेस? असे टोमणे मारतात लोक? ५ पदार्थ खा, वजन वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 4:55 PM

5 Best Foods To Gain Weight At Home : कमी वजन असल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

जगभरात अनेकजण लठ्ठपणाने त्रस्त आहेत तर काहीजण आपल्या पातळ शरीरयष्टीमुळे कॉन्फिडंट दिसू शकत नाही. (How To Gain Weight at Home) वजन कमी असलेले आणि बारीक दिसणारे लोक आपल्या पर्सनॅलिटीमुळे कायम ताण-तणावाखाली असतात. शरीराच्या उंचीप्रमाणे तुम्ही वजन नियंत्रणात ठेवायला हवं. (Health Tips) कमी वजन असल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Natural Ways to Gain Weight Fast) अनेकांना  मित्रमैत्रिणींकडून किंवा नातेवाईकांकडून वजनावरून टोमणेही ऐकावे लागतात. 

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार शरीराचे वजन वाढवण्यासाठी व्हेज फुड्स प्लांट प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे किंवा आहारात बदल करावा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्हेजिटेरियन पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (5 Best Foods To Gain Weight In 7 Days At Home Natural Ways to Gain Weight Fast)

1) वजन वाढवण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स जसं की दूध, दही, पनीर लोणी उत्तम मानले जातात. या पदार्थांत प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात. डेअरी प्रोडक्ट्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं स्ट्राँग राहतात.

2) नट्स आणि नट्स वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यात जास्त कॅलरीज असतात. ज्यात फॅट्सचे प्रमाण जास्त असते.  खाण्यापिण्याच्या पदार्थांचे स्नॅक्सच्या स्वरूपात सेवन करू शकता.

सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

3) एवोकाडोचे सेवन केल्याने वजन वाढवण्यास मदत होते. एवोकाडोमध्ये फॅट्स असतात. यात ३६५ कॅलरीज, ३० ग्राम फॅट्स, १७ ग्रॅम फायबर्स असतात. एवोकाडो  तुम्ही फळाच्या स्वरूपात खाऊ शकता. 

4) अनेकदा प्रयत्न करूनही तुमचे वजन वाढत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हे प्रोटीन्सचे सेवन करू शकता. व्हे प्रोटीन दूधापासून तयार झालेले असते. यात हेल्दी प्रोटीन्स असतात. याचे सेवन केल्यास मसल्सची चांगली वाढ होते आणि शरीराला ताकद मिळते.

पोट कमी करायचंय? नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच घ्या 'हा' एकदम साधा आहार-स्लिम होईल पोट

5) मांसपेशींचा विकास आणि मेंटेनंससाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. यात  अंडी, डेअरी उत्पादनं, प्रोटीन्स, टोफू, टेम्पेह या पदार्थांचा समावेश असेल.

6) दोन्ही वेळच्या जेवणात भाताचा समावेश करा. भात कॅलरीज कमी करण्याचा एक सोपा उपाय आहे. यात कॅलरीज, कार्ब्स आणि कमीत कमी प्रमाणात फॅट्स असतात. एक वाटी तांदूळाबरोबर तुम्ही याचे सेवन करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्स